बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोहर मामा भोसलेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, दिलासा नाहीच!

बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. करमाळा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोहर भोसलेला दिलासा देण्यास कोर्टाने स्पष्ट शब्दात नकार दिला.

बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोहर मामा भोसलेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी, दिलासा नाहीच!
मनोहर भोसले

सोलापूर : बलात्कार प्रकरणातील आरोपी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले याला पंधरा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. करमाळा न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोहर भोसलेला दिलासा देण्यास कोर्टाने स्पष्ट शब्दात नकार दिला.

करमाळा तालुक्यातील उंदरगाव आश्रमातील अटकेत असलेला मनोहर भोसले याला करमाळा पोलिसांनी 19 सप्टेंबरला अटक केली होती. त्यानंतर त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली होती, दरम्यान मनोहर भोसले आजारी पडल्याने सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर आधी एक दिवसाची कोठडी देण्यात आली त्यानंतर त्याची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय.

फसवणूक आणि धमकीचे आरोप

बारामतीतील शशिकांत खरात याच्या वडीलांच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर, भंडारा खाण्यास दिला. विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी 2 लाख 51 हजार रुपये घेत फसवणूक केली. पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा मनोहर मामावर आरोप आहे.

याप्रकरणी भोसलेसह त्याचे साथीदार विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे फरार आहेत. या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याआधीही मनोहर मामांविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल

बारामती तालुक्यातील महेश आटोळे यांनी मनोहर मामा उर्फ मनोहर भोसले यांनी अंधश्रद्धेतून फसवणूक झाल्याची तक्रार 31 ऑगस्ट 2021 रोजी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे की, माझ्याकडून त्यांनी जवळपास 40 लाख रुपयाचा रो हाऊस घेतला होता. मात्र माझी कुठलीच कामे मार्गी लागली नाहीत. त्यामुळे मी दिलेला रो हाऊस मनोहर मामा यांना परत मागितला. मात्र रो हाऊस मी तुला देणार नाही, कारण तुझ्या तंत्रविद्या करण्यात माझे लाखो रुपये खर्च झाले आहेत. तू मला ते पैसे परत कर त्यावेळेसच मी रो हाऊस परत करेन, असं मनोहर मामा यांनी सांगितले. यामुळे आटोळे यांनी फसवणूक झाल्याची तक्रार बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

(Manohar Mama Bhosle, accused in the rape case, remanded in judicial custody for 15 days)

हे ही वाचा :

मनोहरमामा उर्फ मनोहर भोसलेसह तिघांवर बारामतीत गुन्हा दाखल, संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत केली फसवणूक

मनोहर मामा भोसलेला दिलासा नाहीच, आणखी 3 दिवसांची पोलिस कोठडी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI