Gunratna Sadavarte : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता पुणे पोलिसही अॅड गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याची शक्यता

एका वृत्तवाहिनीवर मराठा आरक्षण अनुषंगाने कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचे प्रक्षेपण चालू अशताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व खासदार संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gunratna Sadavarte : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आता पुणे पोलिसही अॅड गुणरत्न सदावर्तेंचा ताबा घेण्याची शक्यता
गुणरत्न सदावर्ते
Image Credit source: tv9 marathi
रणजीत जाधव

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Apr 15, 2022 | 9:18 PM

पुणे : खासदार संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त (Controversial) वक्तव्य केल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratna Sadavarte) यांच्याविरोधात पुण्यात भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 9 ऑक्टोबर 2020 रोजी एका वृत्तवाहिनीवर चर्चा सत्राचे प्रक्षेपण चालू असताना गुणरत्न सदावर्तेंनी संभाजीराजेंबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सदावर्ते यांच्याविरोधात भादवी कलम 153(अ), 295(अ), 504, 502(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून सदावर्ते यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. (Now Pune Police is also likely to take possession of Ad Gunaratna Sadavarten in connection with the controversial statement)

पुणे पोलिस सदावर्तेंचा ताबा घेण्याची शक्यता

एका वृत्तवाहिनीवर मराठा आरक्षण अनुषंगाने कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचे प्रक्षेपण चालू अशताना अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज व खासदार संभाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर रामचंद्र पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिस करीत असून याप्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल करण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी नुकताच गृह विभागाकडे पाठविण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासासाठी पुणे पोलिस सदावर्तेंचा ताबा घेण्याची शक्यता आहे. पुणे पोलिसांकडून तशा हालचाली सुरु आहेत. (Now Pune Police is also likely to take possession of Ad Gunaratna Sadavarte in connection with the controversial statement)

इतर बातम्या

Nanded Murder : नांदेडमध्ये मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन तरुणाची हत्या

Gunratna Sadavarte wife: जयश्री पाटील नॉट रिचेबल! मुंबई पोलिसांकडून शोध घेण्याचे प्रयत्न सुरु

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें