कोल्ड्रिंक पाजून तिला बेशुद्ध केलं, नंतर इच्छा नसतानाही जबरदस्ती संभोग! पिंपरी चिंचवड बलात्काराच्या घटनेनं हादरलं

कोल्ड्रिंक पाजून तिला बेशुद्ध केलं, नंतर इच्छा नसतानाही जबरदस्ती संभोग! पिंपरी चिंचवड बलात्काराच्या घटनेनं हादरलं
धक्कादायक घटना
Image Credit source: TV9 Marathi

Pimpari Chinchwad crime : तिच्या इच्छेविरुद्ध शुभमने तिच्यासोबत संभोग केला, तसंच आपल्या घरातून बाहेर जाण्यासही मज्जाव केला, असा आरोप करण्यात आलाय

रणजीत जाधव

| Edited By: सिद्धेश सावंत

May 24, 2022 | 8:39 AM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad Rape News) एका महिलेवर बलात्कार (Rape Case) करण्यात आला. कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचं औषध टाकून या महिलेला आधी बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर तरुणानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण पिंपरी-चिंचडवमध्ये खळबळ उडाली आहे. या बलात्कारप्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी अटकही (Hinjwadi Police Arrested Accused) केली आहे. हिंजवडी पोलिसांनी याप्रकरणी अटकेची कारवाई केली आहे. तुझ्यशी काहीतरी बोलायचं, असं म्हणत आधी तरुणानं महिलेला बोलावून घेतलं. त्यानंतर तिला आपल्या वाहनावर बसवून घेऊन गेला. तिथे गेल्यावर तिला कोल्ड्रिंग पाजून बेशुद्ध करत तरुणानं गैरकृत्य केलंय.

कोण आहे तो नराधम?

शुभम विनायक बने असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आलाय. हिंजवडी पोलिसांनी शुभमला अटकही केली आहे.

शुभमने पीडित महिलेला भेटायला बोलावलं होतं. तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय, असा बहाणा शुभमने केला होता. त्यानंतर भेटायला आलेल्या महिलेला तो आपल्या वाहनावर बसवून घेऊन गेला होता. शुभम बने यानं आपण राहत असलेल्या मारूजींमधील कोलते पाटील इथं या पीडित महिलेला आणलं. इथं आणल्यानंतर या महिलेला शुभमनं कोल्ड्रिंग दिलं.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

इच्छेविरुद्ध संभोग

कोल्ड्रिंग प्यायलानंतर ही महिला बेशुद्ध झाली होती. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध शुभमने तिच्यासोबत संभोग केला, तसंच आपल्या घरातून बाहेर जाण्यासही मज्जाव केला, असा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांत तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार पोलिसांनी शुभम बने याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करुन घेत त्याला बेड्या ठोकल्यात. सध्या हिंजवडी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें