AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील कंपनीवर ईडीची कारवाई, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

ED Raid In Pune | अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने विनोद खुटे यांची ३८ कोटी ५० लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी करत बँकेतील २३ कोटींची रक्कम सुद्धा गोठवली आहे.

पुण्यातील कंपनीवर ईडीची कारवाई, कोट्यवधींची मालमत्ता जप्त
विनोद तुकाराम खुटे
| Updated on: Mar 14, 2024 | 11:06 AM
Share

पुणे | 14 मार्च 2024 : मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदरांची १२५ कोटींमध्ये फसवणूक करणाऱ्या पुण्यातील विनोद खुटेवर कारवाई झाली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीजची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने विनोद खुटे यांची ३८ कोटी ५० लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये छापेमारी करत बँकेतील २३ कोटींची रक्कम सुद्धा गोठवली आहे. खुटे याने काना कॅपिटलच्या ब्रोकरेजमध्ये विविध गुंतवणूकदारांकडून १२५ कोटी रुपयांचा निधी गोळा केल्याचा आरोप तपास एजन्सीने केला आहे. खुटे फसवणूक करुन दुबईत फरार झाला आहे. दुबईत त्याचे अनेक फ्लॅट्स असल्याची माहिती समोर आली आहे.

हवालाद्वारे पैसा विदेशात

ईडीने काही महिन्यांपूर्वी विनोद खुटे याच्या कंपनीच्या पुणे आणि अहमदनगर येथील कार्यालयाची झडती घेतली होती. त्यावेळी त्या कंपनीची 18.54 कोटी रुपयांची बँकेतील रक्कम गोठवली होती. विनोद कुटे याचा VIPS ग्रुप ऑफ कंपनीजकडून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यवहार झाले. त्यात क्रिप्टो एक्स्चेंजसह वॉलेट सेवांचाही समावेश आहे. तसेच हवालाद्वारे तो परदेशात पैसे पाठवतो. तसेच तो ई-कॉमर्स शॉपिंग पोर्टलद्वारे उत्पादने विकतो. यामुळे ईडीचे लक्ष त्याच्याकडे गेले आणि कारवाईला सुरुवात झाली.

गुंतवणूक योजनांचे आमिष दाखवून फसवणूक

पुणे शहरात विनोद खुटे याने धनश्री मल्टी स्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी तयार केली. त्याने गुंतवणुकदारांना चांगल्या व्याजाचे आमिष दाखवले. इतर ठिकाणी मिळत असलेल्या व्याजापेक्षा जास्त व्याज दिले. यामुळे असंख्य गुंतवणूकदारांनी त्याच्या पतपेढीत मोठी गुंतवणूक केली.

ही गुंतवणूक त्याने हवाला चॅनेल आणि शेल कंपन्यांद्वारे देशाबाहेर पाठवली. या प्रकरणात विनोद तुकाराम खुटे, संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण पीतांबर अनारसे, अजिंक्य बदाधे आणि अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.