हॅलो, मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा !, वाकडच्या इंजिनियर तरुणाचा फेक कॉल

पंतप्रधानांच्या जीवा धोका असल्याचा कॉल पुण्यातील पिंपरी - चिंचवड येथील पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला आणि एकच खळबळ उडाली. पुणे मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान पुण्याच्या दौऱ्यावर येणार असतानाच हा कॉल आल्याने पोलिसांची धावपळ उडाली.

हॅलो, मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा !, वाकडच्या इंजिनियर तरुणाचा फेक कॉल
phone-call-treat
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 7:13 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील विकासकामांचे उद्घाटन होणार होते. त्याच दरम्यान पिंपरी – चिंचवड येथील पोलिसांच्या कंट्रोल रुमला एक निनावी कॉल आला आणि यंत्रणा कामी लागली. एका तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असून त्यांना वाचवा असा कॉल आल्याने पोलिसांना सर्वत्र तपासणी केली. सकाळी सात ते साडे सातच्या सुमारास हा कॉल आला. दरम्यान पावसामुळे मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याची बातमी आल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. मात्र त्या कॉलचा छडा लावला असता हा कॉल एका तरुणाने मानसिक ताणामुळे केल्याची कबूली दिली आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे.

पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे, त्यांना वाचवा ! असा कॉल पिंपरी चिंचवडच्या कंट्रोल रूमला गुरुवारी सकाळी आला आणि यंत्रणा अलर्ट मोडवर गेली. पुणे दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असतानाट हा कॉल आल्यानं पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. मात्र तातडीने तपासाची चक्रे फिरवून निनावी कॉल करणाऱ्या पर्यंत पोलिस पोहचले देखील. त्याच दरम्यान पंतप्रधानांचा दौरा रद्द झाल्याची बातमी धडकली. या फोनचा तपास केला असताना हा निनावी बोगस कॉल एका आयटी अभियंत्याने केल्याचे उघडकीस आले आहे.

नोटीस पिरियडवर तरुणाचं कृत्य

निनावी फोन करणाऱ्या तरुणाने पंतप्रधानांच्या जीवाला धोका आहे, याबाबत मंत्रालयाला कळवावे असे सांगितले होते. त्या तरुणाला ताब्यात घेत हे तू कशाच्या आधारावर सांगितले असा सवाल पोलिसांनी केला. त्यावर त्याने मोदींच्या अमेरिका दौऱ्याचं कनेक्शन जोडलं. अमेरिकेत मोदी गुगलच्या सीईओना भेटले, अशातच आर्टिफिशियल इंटिलिजेंस फिचरवरून काहीही घडतं. हे मी ऐकलंय, त्यामुळं मोदींच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असं मला वाटतं असे त्याने सांगितले. त्याने दिलेल्या उत्तरात काहीच तथ्य नसल्याचं अन तो काहीही अवांतर बोलत असल्याचे स्पष्ट झाले. हा तरुण मानसिक तणावात असल्याचं दिसून आलं.तो मूळचा उदगीरचा असून त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असता, कंपनीने त्याला नोटीस पिरियडवर ठेवलं आहे. त्यामुळं तो मेंटली डिस्टर्ब असल्याचं कळतं. वाकड पोलिसांनी त्याच्या भावाला बोलावले या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला योग्य ती समज दिल्यानंतर भावाकडे सुपूर्त केलं जाणार आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....