Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एटीएम बाहेर उभे राहून लोकांना घालत होते गंडा, 147 एटीएम कार्ड बदलले, अखेर…

Pune Crime News: समून रमजान, नसरुद्दीन खान आणि बादशाह खान आणि आदिल खान यांनी महाराष्ट्रासह उत्तरप्रदेशात अनेकांना गंडा घातला. ही टोळी साताऱ्याच्या दिशेने खेड-शिवापूर टोल नाक्यावरुन भरधाव वेगाने जात होती. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली

एटीएम बाहेर उभे राहून लोकांना घालत होते गंडा, 147 एटीएम कार्ड बदलले, अखेर...
crime news
Follow us
| Updated on: Jan 18, 2025 | 6:12 PM

Pune Crime News: फसवणूक करणाऱ्या टोळ्या विविध माध्यमातून नागरिकांची फसवणूक करत असतात. एकीकडे सायबर क्राईम वाढत असताना त्यासंदर्भात जागृतताही केली जाते. परंतु भामटे फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार शोधत असतात. नागरिकांची फसवणूक करून त्यांचे एटीएम कार्ड हस्तगत करणारी टोळी उघड झाली आहे. सर्वसामान्य लोकांच्या खात्यातून पैसे चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी पुणे पोलिसांनी उघड केली आहे. या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १४७ एटीएम कार्ड पोलिसांनी जप्त केले आहे.

एटीएमची करत होते अदलाबदल

समून रमजान, नसरुद्दीन खान आणि बादशाह खान आणि आदिल खान हे एटीएम बाहेर अनेकांना गंडा घालत होते. हात चलाखी करुन एटीएमची अदलाबदल करत होते. वेळप्रसंगी दमदाटी करुन एटीएम कार्ड आणि एटीएम पिन क्रमांक घेत होते. त्यासंदर्भात पुणे ग्रामीण पोलिसांकडे अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर राजवड पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. त्यात ते अडकले आणि त्यांचा पर्दाफाश झाला.

पोलिसांनी तिघांना केली अटक

समून रमजान, नसरुद्दीन खान आणि बादशाह खान आणि आदिल खान यांनी महाराष्ट्रासह उत्तरप्रदेशात अनेकांना गंडा घातला. ही टोळी साताऱ्याच्या दिशेने खेड-शिवापूर टोल नाक्यावरुन भरधाव वेगाने जात होती. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्याबाबत राजगड पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर सापळा रचून या टोळीला जेरबंद करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

समून रमजान, नसरुद्दीन खान आणि बादशाह खान आणि आदिल खान यांच्या टोळीने आणखी कुठे अन किती जणांना गंडा घातला आहे? त्याचा तपास पुणे ग्रामीण पोलीस करत आहे. समून रमजान, नसरुद्दीन खान आणि बादशाह खान या तिघ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आदिल खान हा फरार झाला आहे. त्याचा शोध सुरु आहे. हे मूळ उत्तरप्रदेश आणि हरियाणा राज्याचे रहिवाशी आहेत. आरोपींना २२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.