AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Police: दसऱ्याच्या दिवशी पुणे पोलीस आयुक्तालयात मोठा बदल, पुण्यातील गुन्हेगारी संपवणार पॅटर्न लागू

Pune Police: पुणे शहरात सात पोलीस ठाणी सुरु झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पुणे पोलीस दलात ८१६ पदांसाठी मान्यता दिली गेली आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या इमारत उभारणीसाठी निधी मंजूर केला आहे.

Pune Police: दसऱ्याच्या दिवशी पुणे पोलीस आयुक्तालयात मोठा बदल, पुण्यातील गुन्हेगारी संपवणार पॅटर्न लागू
Pune Police
| Updated on: Oct 12, 2024 | 12:31 PM
Share

पुणे शहरातील गुन्हेगारी काही महिन्यांपासून वाढली आहे. हत्या, अत्याचार, दरोडे, कोयता हल्ले वाढले आहेत. पुण्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यात पुणे पोलिसांना यश येत नाही. परंतु आता गुन्हेगारांना वचक बसणारा निर्णय लागू झाला आहे. दसऱ्याच्या दिवशी पुणे पोलीस दलात मोठा बदल झाला आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारित नव्याने सात पोलीस ठाणी दसऱ्यापासून सुरु झाली आहे. शुक्रवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या पोलीस ठाण्यांचे उदघाटन केल्यानंतर शनिवारी सात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.

पुण्यात सात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची नियुक्ती

पुण्यातील नवीन झालेल्या सात पोलीस स्टेशनला नवनियुक्त पोलीस वरिष्ठ निरीक्षक मिळाले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणीस अन् पालकमंत्री अजित पवार यांनी उद्घाटन केल्यानंतर दसऱ्यापासून या पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरु झाले आहे. कोणत्या पोलीस ठाण्यावर कोणाची नियुक्ती झाली पाहू या…

  1. शरद झीने आंबेगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर.
  2. अतुल भोस वरिष्ठ पोलीस निरीक्षक नांदेड सिटी‌.
  3. महेश बोलकोटगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाणेर.
  4. संजय चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक खराडी.
  5. पंडित रजेतवाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली.
  6. मंगल मोढवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फुरसुंगी.
  7. मानसिंग पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळेपडळ.

दहा वर्षानंतर आयुक्तालयात बदल

पुणे पोलीस आयुक्तालयात दहा वर्षांनंतर बदल झाला आहे. आता आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी ही सात पोलीस ठाणे सुरू झाली आहे. यामुळे इतर मोठ्या पोलीस ठाण्यांवरील कामाचा ताण कमी होणार आहे.

नवीन पदांना मान्यता, इमारतींसाठी निधी

पुणे शहरात सात पोलीस ठाणी सुरु झाल्यानंतर त्या ठिकाणी नवीन पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. पुणे पोलीस दलात ८१६ पदांसाठी मान्यता दिली गेली आहे. तसेच पोलीस ठाण्याच्या इमारत उभारणीसाठी निधी मंजूर केला आहे. सात पोलीस ठाण्यांच्या इमारतीसाठी एकूण ६० कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या नव्या इमारत उभारणीसाठी २५ कोटी रूपये मंजूर केले आहेत.

असा मिळणार निधी

  • दोन हजार ८८६ सीसीटीव्हींसाठी ४३३ कोटींच्या निधीला मंजुरी
  • नवीन पोलीस आयुक्तालय इमारत उभारणीसाठी १९३ कोटी
  • बंडगार्डन पोलीस ठाण्याची इमारत उभारणीसाठी २९ कोटी
  • पोलीस ठाण्यांच्या इमारतीसाठी एकूण ६० कोटी

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.