बायकोच्या पायगुणाने मंत्रिपद यायचं नाही, सोडचिठ्ठी दे, पुण्यात बड्या राजकीय गुरुला अटक

उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केल्या प्रकरणी उद्योजक पती, कुटुंबातील तिघांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बायकोच्या पायगुणाने मंत्रिपद यायचं नाही, सोडचिठ्ठी दे, पुण्यात बड्या राजकीय गुरुला अटक
रघुनाथ येमुल गुरुजी
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 7:40 AM

पुणे : पुण्यातील प्रतिष्ठित कुटुंबाला आपल्याच सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी बड्या राजकीय गुरुला अटक करण्यात आली आहे. रघुनाथ येंमुल (Raghunath Yemul) याला चतुःश्रृंगी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. “तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, तिच्यामुळे तू आमदार, मंत्रीही होणार नाहीस” अशा भूलथापा लावून संबंधित कुटुंबाला महिलेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण केल्या प्रकरणी उद्योजक पती, कुटुंबातील तिघांसह एकूण आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेतील आरोपींमध्ये येंमुलचाही समावेश आहे. रघुनाथ येंमुल हा मोठा राजकीय गुरु असल्याची माहिती आहे. प्रतिष्ठित कुटुंबाला सुनेचा छळ करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. रघुनाथ येंमुल याच्या अटकेने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

रघुनाथ येमुलने काय सांगितले?

“तुझी बायको पांढऱ्या पायाची आहे, तिची जन्मवेळ चुकीची असून तिचे ग्रहमान दूषित झाले आहे. जर ही तुझी बायको म्हणून कायम राहिली, तर तू मंत्री काय, आमदारही होणार नाहीस, तिला लवकरात लवकर सोडचिठ्ठी दे आणि तुझा मुलगा तिच्याकडून काढून घे” असा सल्ला प्रतिष्ठित कुटुंबाला या राजकीय गुरुने दिल्याचं समोर आलं आहे.

27 वर्षीय पीडित विवाहितेने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. जानेवारी 2017 पासून सासरच्या मंडळींकडून आपला छळ होत असल्याचा आरोप तिने केला आहे.

कोण आहे रघुनाथ येमुल?

48 वर्षीय रघुनाथ येंमुल हा पुण्यातील बाणेरमध्ये आयव्हरी इस्टेट भागात राहतो. राजकीय क्षेत्रापासून प्रशासनापर्यंत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी येंमुलचे निकटचे संबंध असल्याची माहिती आहे. अनेक जण त्याच्या दरबारात हजेरी लावत असतात. रघुनाथ येंमुल याच्या अटकेने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

कल्याणच्या प्रसिद्ध उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हा

नागपूरच्या ड्रग्स तस्करांचं मुंबई कनेक्शन, मालाडमधून मामूला बेड्या

(Pune Spiritual Guru Raghunath Yemul arrested for abetting a family to harass daughter in law)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.