पुणे मेट्रो कारशेडमध्ये झालेल्या गोळीबाराचं गूढ कायम! ‘ती’ काडतुसं आली कुठून?

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 28, 2021 | 5:34 PM

पुण्यातल्या (Pune) मध्यवर्ती भागात असलेल्या कोथरूड (Kothrud) इथल्या मेट्रो कारशेडमध्ये (Metro Car Shed) बुधवारी संध्याकाळच्या सुमारास गोळीबार (Firing) झाल्याचं उघड झालं होतं. पण अद्यापपर्यंत या गोळाबाराचं गूढ उकलण्यात यश आलेलं नाही.

पुणे मेट्रो कारशेडमध्ये झालेल्या गोळीबाराचं गूढ कायम! 'ती' काडतुसं आली कुठून?
प्रातिनिधिक फोटो
Follow us

पुणे : पुण्यातल्या (Pune) मध्यवर्ती भागात असलेल्या कोथरूड (Kothrud) इथल्या मेट्रो कारशेडमध्ये (Metro Car Shed) बुधवारी संध्याकाळच्या सुमारास गोळीबार (Firing) झाल्याचं उघड झालं होतं. सोबतच परिसरात काही राऊंडही (Bullets) आढळून आले होते. पण अद्यापपर्यंत या गोळाबाराचं गूढ उकलण्यात यश आलेलं नाही. त्यामुळे ही गोळी कुठून चालली, या परिसरात राऊंड कुठून आले याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. (The mystery of the shooting at the Metro car shed in Pune has not been solved yet)

लष्कराकडून स्पष्टीकरण

लष्कराच्या सरावादरम्यान या गोळ्या चुकून मेट्रो कारशेडमध्ये घुसल्या असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र, या गोळ्यांशी काहीही संबंध नसल्याचं लष्करानं स्पष्ट केलं आहे. कोथरूड कचरा डेपोजवळ सैन्यदलाच्या कोणत्याही युनिटची फायरिंग रेंज नाही. त्यामुळे मेट्रो कारशेडजवळ लष्कराच्या सरावादरम्यान गोळीबार झाला असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं लष्करी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

रायफलच्या गोळ्या असण्याची शक्यता

पुणे मेट्रोच्या कारशेडमध्ये आढळून आलेली काडतुसं ही एसएलआर किंवा एके-47 रायफलीसारख्या बंदुकीच्या असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात मेट्रोसाठी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला गोळी चाटून गेल्यानं घटनेचं गांभीर्य वाढलं आहे.

कोथरूडसारख्या भागात थेट एसएलआर किंवा एके-47 रायफलसारख्या बंदुकीतून फायरिंग केलेल्या गोळ्या कुठून आल्या असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या या गोळ्या तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर त्यादृष्टीने पुढचा तपास केला जाणार आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

कारशेटमध्ये आढळून आलेल्या गोळ्या या रायफलच्या असण्याच्या वृत्ताला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर कोथरूड पोलिसांनी लष्कराकडे पत्रव्यवहार केला आहे. कोथरूड पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी लष्कराच्या टेकडीवर जाऊन पाहणीही केली आहे. याठिकाणी कोणताही गोळीबाराचा सराव केला जात नाही असं, त्यांना सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुढचा तपास केल जात आहे.

इतर बातम्या :

पुण्यात 25 वर्षीय महिलेवर घरात घुसून अत्याचार, पोलिसांनी दरवाजा तोडून चौघांना रंगेहाथ पकडलं

प्रेम एकीवर केलं, लग्न दुसरीसोबतच, पहिलीनं अंगावर रॉकेल ओतून घेतलं, आता जगण्यासाठी संघर्ष

भाजप नेत्याचा कारनामा, मित्राच्या बायकोला म्हणतो ‘दीर-वहिनीमध्ये सेXX चालतो’, धू-धू धुतला

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI