AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Mohol | शरद मोहोळच्या हत्येत मुन्ना पोळेकर फक्त मोहरा, खरा मास्टर माईंड समोर

मुन्ना पोळेकर याने आधी मोहोळच्या विश्वासू आणि कायम सोबत राहणाऱ्या पोरांशी ओळख केली. या पोरांसोबतच पोळेकर मोहोळच्या चांगला जवळ गेला होता. पण यामागे वेगळ्याच कोणाचं तरी डोकं होतं? तो मास्टरमाईंड नेमका कोण जाणून घ्या.

Sharad Mohol | शरद मोहोळच्या हत्येत मुन्ना पोळेकर फक्त मोहरा, खरा मास्टर माईंड समोर
| Updated on: Jan 06, 2024 | 7:18 PM
Share

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मोहोळ गँगचा म्होरक्या असणाऱ्या शरद मोहोळ याच्या हत्यने सर्वत्र खळबळ उडाली होती. दुपारी दीड वाजता त्याच्याच घराजवळ साथीदारांनी गोळ्या घालत त्याला खल्लास करून टाकलं. मुन्ना पोळेकर या प्रकरणातील मुख्य आरोपी असून मोहोळच्या तो सोबतच होता. पोलिसांनी एकून आठ जणांना या प्रकरणामध्ये अटक केली आहे. मुन्ना पोळेकर हा मुख्य आरोपी असला तरी खरा मास्टरमाईंड कोण हे समोर आलं आहे. पोलिसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये प्रभारी सह आयुक्त आणि अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे याबाबत खुलासा केला आहे.

कोण आहे तो मास्टरमाईंड?

शरद मोहोळ याच्या हत्येमधील आरोपी नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गडले यांचं पुर्ववैमनस्य होतं. रेकॉर्डमध्ये मोहोळ आणि यांच्यात आधी एकदा भांडणं झाल्याची तक्रार होती. शरद मोहोळ याला एकदम फुल प्लॅनिंग करून संपवलेलं दिसत आहे. कारण पोलिसांनी सांगितल्यानुसार, मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्या घरापासून काहीच अंतरावर राहत होता. मोहोळ याच्याशी जवळीक वाढवण्यासाठी मुन्ना पोळेकर याने आधी मोहोळच्या विश्वासू आणि कायम सोबत राहणाऱ्या पोरांशी ओळख केली. या पोरांसोबतच पोळेकर मोहोळच्या चांगला जवळ आला होता. गेल्या पंधरा दिवसांपासून मोहोळच्या ऑफिससह तो त्याच्यासोबत फिरत होता.

मुन्ना पोळेकर त्याचा मामा नामदेव उर्फ पप्पू कानगुडेचाच माणूस होता. पोळकर याचे इन्स्टा अकाऊंट पाहिल्यावर त्याने ज्या काही पोस्ट केल्या आहेत त्यामध्ये आपल्या मामा आधारस्तंभ असल्याच्या अनेक पोस्ट आहेत. मामासोबत त्याचे अनेक फोटो असलेले पाहायला मिळतील. आरोपींमधील विठ्ठल गडले आणि नामदेव कानगुडे यांची आधीची भांडणं होतीच, त्यामुळे काटा काढण्यासाठी त्यांनी भाच्याला म्हणजचे मुन्ना पोळेकर याला मोहरं बनवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्ना पोळेकर याने आता गेल्या काही दिवसांपासून मोहोळ याच्याशी जवळीक वाढवली होती. नामदेव कानगुडे आधी पुण्यातच राहत होता त्यानंतर तो भूगावला गेलेला. तर पोळेकर आणि शरद  मोहोळ यांच्या घरामध्ये दोनशे ते तीनशे मीटरचं अंतर होतं. प्लॅनिंगनुसार पोळेकरने माहोळच्या जवळ असणाऱ्या पोरांच्या मदतीने जवळीक वाढवली. मोहोळला संपवण्यासाठी त्यांनी लग्नाच्या वाढदिवसादिवशी घरी गेले जेवण केलं.  मोहोळ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी चालला होता तेव्हा आधीच एक शूटर बाहेर दबा धरून बसला होता. मोहोळला बाहेर काढल्यावर पाठिमागून त्याच्यावर मुन्ना पोळेकरने गोळ्या झाडल्या. एकूण तीन जणांनी गोळया मारल्या होत्या.

दरम्यान, एकंदरित आतापर्यंत समोर आलेली माहिती पाहता मुन्ना पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गडले मास्टर माईंड आहेत. मुन्नाला मोहरा बनवत त्यांनी मोहोळला संपवलं. पूर्ववैमनस्याचं खरं कारण आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यावर समोर येईल.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.