AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भयानकच… ते अचानक घरातून निघून जात आहेत… महिन्याभरात 5 बेपत्ता; पुण्यातील शिरुरमध्ये चाललंय काय ?

नेहमी काही ना काही कारणासाठी चर्चेत असलेलं पुणे आता पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी पुण्यातील शिरूर आहे. शिरूरमधून लोक गायब होण्याचे प्रकार वाढले आहेत. अल्पवयीन मुलींसह तरुण आणि तरुणीही गायब होत झाल्याने खळबळ उडाली आहे. विविध पोलीस ठाण्यात या मिसिंगच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

भयानकच... ते अचानक घरातून निघून जात आहेत... महिन्याभरात 5 बेपत्ता; पुण्यातील शिरुरमध्ये चाललंय काय ?
| Edited By: | Updated on: Aug 07, 2024 | 11:37 AM
Share

पुण्यातील शिरुरमध्ये सध्या एकाच गोष्टीचं टेन्शन वाढलं आहे. शिरुरमध्ये अवघ्या महिन्याभरात पाच लोक अचानक बेपत्ता झाले आहेत. कुणाला काहीही न सांगता घरातून निघून जाण्याचं हे प्रमाण वाढलं आहे. यात महिला, पुरुष आणि तरुणांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलींचाही त्यात समावेश आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. अचानक हे लोक गायब होत असल्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. तर तालुक्यात या घटनेमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

जुने शिरुर (रामलिंगम) या भागातून सुमन सखाराम साळवे ही 44 वर्षाची महिला तिचा मुलगा जीवन सखाराम साळवे वय 18 याच्यासोबत गायब झाली आहे. रविवारी सकाळी सुमन आणि तिचा मुलगा जीवन सकाळी सात वाजता घरातून बाहेर पडले. पण रात्री उशीर जाला तरी दोघेही घरी आले नाही. सुमन हिने पती सखाराम साळवे यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवला होता. शााळेतील शिक्षक व कर्मचारी त्रास देत असल्याने आम्ही निघून जात आहोत, असं या मेसेजमध्ये म्हटल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी सखाराम यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस नाईक एन.बी. शिंदे या प्रकरणाचा तपास करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

सोनार आळीतून तरुणी बेपत्ता

शिरूर शहरातील सोनार आळीतून प्रतिक्षा वैभव शहा ही 20 वर्षाची तरुणी बेपत्ता झाली आहे. ही मुलगी 23 जुलैपासून बेपत्ता आहे. तिचा अजूनही शोध लागलेला नाही. पोलीस कसून तपास करत आहेत.

इन्स्टाग्रामवर ओळख अन्…

शिरूरच्या बागवान नगरमधील एक अल्पवयीन मुलगीही बेपत्ता झाली आहे. इन्स्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीबरोबर ओळख झाली. त्याच्यासोबत ही मुलगी चॅटिंग करायची. त्यामुळे आई रागवल्याने ती घर सोडून गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.

भाजी मार्केटमधून गायब

मनिषा राजेंद्र शुक्ला ही 35 वर्षाची महिला शिक्रापूर येथून गायब झाली आहे. भाजी मार्केटमध्ये गेलेली मनिषा परत आलीच नाही. कुणाला काहीही न सांगता ती निघून गेली. कुटुंबीयांनी नातेवाईक, शेजारीपाजारी, मित्र मैत्रिणी सर्वांना विचारून पाहिले, पण कुणाकडेही मनिषा दिसली नाही. या महिलेच्या कानात सोन्याची रिंग आहे, गळ्यात सोन्याचं मंगळसूत्र आहे, पायात पैंजण आणि जोडवे आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

नोकरीसाठी गेला तो आलाच नाही

पुण्यातही एक तरुण अचानक गायब झाल्याची घटना घडली आहे. बुद्धभूषण पठारे असं या तरुणाचं नाव आहे. तो 24 वर्षाचा असून एमपीएससीचा विद्यार्थी आहे. मंत्रालयात नोकरी लागल्याचं त्याने घरी सांगितलं होतं. त्यानंतर तो गायब झाला. आज तीन महिने झाले तरी त्याचा पत्ता लागलेला नाही. हा तरुण कुठे गेला? कुणासोबत आहे? त्याचं काय झालं? याचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांना प्रचंड टेन्शन आलं आहे.

बुद्धभूषण हा मूळचा छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील आहे. तो पुण्यात गेल्या चार वर्षापासून एमपीएससीची तयारी करतो. पुण्यातील गांजवे चौकातील परिसरात एका इमारतीत राहतो. मे महिन्यात त्याने घरी फोन करून मंत्रालयात नोकरी लागल्याचे सांगितले. त्यानंतर तो मुंबईत आला. पण तेव्हापासून तो बेपत्ता आहे. त्याचा फोन लागत नाही. व्हॉट्सअप बंद आहे. त्याच्या वडिलांनी पुण्याच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. काही दिवसांपूर्वी त्याचा कुटुंबीयांना अचानक व्हॉट्सअपवर मेसेज आला. आपण डिप्रेशनमध्ये आहोत, असं त्याने सांगितलं. पण तो नेमका कुठे आहे? हे अद्यापही समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.