Pune Porsche Case : अल्पवयीन आरोपीच्या आजोबांची हायकोर्टात धाव, चुकीच्या आरोपाखाली अडकवल्याचा दावा

पुण्यातील कल्याणीनगर अपघातास जबाबदार अल्पवयीन मुलगा, तसेच त्याचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि आई शिवानी अग्रवाल हे चौघेही सध्या तुरूंगात आहे. दरम्यान या प्रकरणात सध्या तुरूंगात असलेले अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Pune Porsche Case : अल्पवयीन आरोपीच्या आजोबांची हायकोर्टात धाव, चुकीच्या आरोपाखाली अडकवल्याचा दावा
Follow us
| Updated on: Jun 07, 2024 | 8:34 AM

पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगाने पोर्श कारन चालवता बाईकला धडक दिली, त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणात आत्तापर्यंत १० जणांना अटक करण्यात आली आहे. अपघातास जबाबदार अल्पवयीन मुलगा, तसेच त्याचे वडील विशाल अग्रवाल, आजोबा सुरेंद्र अग्रवाल आणि आई शिवानी अग्रवाल हे चौघेही सध्या तुरूंगात आहे. त्यांच्याशिवाय या गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यास मदत करणारे, अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार करण्यास मदत करणाऱ्या इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या प्रकरणात सध्या तुरूंगात असलेले अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सुरेंद्र अग्रवाल यांनी पुणे पोलिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पुणे पोलिसांनी आपल्याला चुकीच्या पद्धतीने अटक केली आहे. माझ्यावर केवळ चुकीचे आरोप करत या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा दावा सुरेंद्र यांनी केला आहे. याप्रकरणी सुरेंद्र यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखली आहे. आता याप्रकरणावर न्यायालय काय निर्देश देते, सुरेंद्र अग्रवाल यांना दिलास मिळतो की त्यांना तुरूंगातच रहावे लागते हे न्यायालयाच्या निर्देशानंतर स्पष्ट होईल. कल्याणी नगर अपघात प्रकरणी ड्रायव्हरला डांबून ठेवत अपहरण केल्याचा आरोप सुरेंद्र अग्रवाल यांच्यावर आहे.

नेमकं काय घडलं ?

हे सुद्धा वाचा

19 मे रोजी मध्यरात्री अल्पवयी मुलाने पबमध्ये जाऊन पार्टी केली, मद्यप्राशनही केले. त्यानंतर त्याने दारूच्या नशेतच पोर्श कार भरधाव वेगाने चालवली आणि एका बाईकला जोरदार धडक दिली. यामध्ये इंजिनिअर तरूण-तरूणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या अपघाताची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घे, असा दबाव त्या दोघांनी त्यांच्या ड्रायव्हरवर टाकल, त्यासाठी त्याचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले असा आरोपही त्यांच्यावर आहे. एवढंच नव्हे तर जबाब बदलण्यासाठी सुरेंद्र अग्रवाल यांच्याकडून ड्रायव्हरवर दबाब आणण्यात आला. यापूर्वी पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांची चौकशी केली. सुरेंद्र अग्रवाल यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्यांना पोलिसांनी बोलावलं होते. आता नातू, मुलगा , आजोबा आणि सून हे चौघेही तुरुंगात आहेत. पोलिसांनी सुरेंद्र अग्रवाल यांच्या घरावरही छापेमारी केलीये. सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड करण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे.

काय आहे पुणे कार अपघात प्रकरण ?

पुण्यात 19 मे रोजी एका महागड्या पोर्शे कारचा अपघात झाला होता. या अपघातात अनिश अवधिया आणि आश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला होता. ही महागडी गाडी अल्पवयीन मुलगा चालवत होता, असा दावा केला जातो. त्यानंतर हे प्रकरण दाबून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही म्हटले जाते. त्याच्या रक्ताचेहू नमुने बदलण्यात आले होते. याच कारणामुळे या प्रकरणाची मोठी चर्चा झाली. त्यानंतर आता पोलिसांच्या तपासात या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत.

Non Stop LIVE Update
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
युवक काँग्रेस आक्रमक, पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको.
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाण्यात पावसाची जोरदार बॅटिंग, पाणी साचल्याने मोठी वाहतूक कोंडी.
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?
नाशिकचा पेच शिंदे सोडवणार? उमेदवार मागे की दादांना विनंती?.
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ
रत्नागिरीमध्ये मुसळधार, जगबुडी नदी इशारा पातळीवर, पाहा व्हिडीओ.
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल
उद्ध्वस्त करणारा तू कोण? भुजबळांच्या टीकेवरून जरांगेंना हाकेंचा सवाल.
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल
याला शिक्षण द्या आधी, माझ्यासमोर लायकी..., हाकेंचा जरांगेंवर हल्लाबोल.
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला
आता सरकार तुम्हालाही पाणी पाजेल, जरांगेंचा हाकेंना सावधगिरीचा सल्ला.
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश
अटल सेतूवर पडल्या भली मोठी भेग, पटोलेंनी केला शिंदे सरकारचा पर्दाफाश.
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं
आम्हाला फसवलं तर...,डिस्चार्ज मिळताच जरांगेंनी गिरीश महाजनांना फटकारलं.
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख
मर्द-षंढशिवाय ज्यांच्याकडे शब्द नाही, त्यांनी योग करावा, शेलारांचा रोख.