Pune Porsche Accident : भयानक ! ससून रुग्णालयातील कर्मचारी नव्हे, ‘त्या’ लोकांनीच आत येऊन बदलले ब्लड सॅम्पल ?

पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारू पिऊन कार चालवत अपघात केला आणि त्यात दोघांचा हकनाक बळी गेला. या घटनेनंतर पोलिसांवर संशय व्यक्त झाला. त्या मुलाला स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्यामुळे सोशल मीडियावरही बरीच टीका झाली. अखेर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलवरूनही बराच गदारोळ झाला

Pune Porsche Accident : भयानक ! ससून रुग्णालयातील कर्मचारी नव्हे, 'त्या' लोकांनीच आत येऊन बदलले ब्लड सॅम्पल ?
दारुवर उधळले आरोपीने इतके रुपये
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 9:25 AM

पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारू पिऊन कार चालवत अपघात केला आणि त्यात दोघांचा हकनाक बळी गेला. या घटनेनंतर पोलिसांवर संशय व्यक्त झाला. त्या मुलाला स्पेशल ट्रीटमेंट मिळाल्यामुळे सोशल मीडियावरही बरीच टीका झाली. अखेर त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड सॅम्पलवरूनही बराच गदारोळ झाला आहे. त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचा दावा खु्द्द पोलिसा आयुक्तांनी केला आणि एकच गोंधळ माजला. ससूनमधील दोन डॉक्टरांनी आणि एका शिपायाने लाच घएऊन त्या मुलाचे ब्लड रिपोर्ट बदलल्याचे समोर आले. याप्रकरणी डॉ अजय तावरे, डॉ श्रीहरी हलनोर आणि घटकांबळे यांना अटक करण्यात आली. काल ससून रुग्णालयाने त्यांची हकालपट्टीही केली. आता याप्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ती म्हणजे अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णालयात काही खासगी लोक घुसले होते आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नव्हे तर त्या लोकांनीच हे नमुने दिले असं समोर आलं आहे. एवढंच नव्हे तर डॉक्टरांनी मुलाचे बदललेले ब्लड सॅम्पल हे एका महिलेचे असून ते सॅम्पल अल्पवयीन मुलाच्या आईचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुलाला वाचवण्यासाठी त्याची आईच पुढे आल्याची चर्चा रंगली आहे.

19 मे च्या मध्यरात्री कल्याणीनगर येथे झालेल्या अपघातानंतर त्या अल्पवयीन मुलाला ससून रुग्णालयात नेऊन वैद्यकीय चाचणीसाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. मात्र त्यामध्ये फेरफार झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांना नमुने देताना ससूनमधील डॉक्टरांनी दुसरेच रक्ताचे नमुने दिले होते. त्यामुळे त्या रक्तचाचणीत कोणताही दोष आढळून आला नव्हता. अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलल्याचे उघड झाल्यावर गदारोळ माजला, मात्र ते रक्त नेमके कोणाचे होते हे काही स्पष्ट झाले नव्हते. अखेर याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. त्यांनी दिलेल्या अहवालातील माहिती पाहून सर्वांन धक्का बसला. अल्पवयीन मुलाऐवजी एका महिलेच्या रक्ताचे नमुने देण्यात आले होते, आणि ते रक्त त्याच्या आईचे होते अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

ससूनच्या कर्मचाऱ्यांनी नव्हे बाहेरच्या लोकांनी बदलले रक्ताचे नमुने

एवंढच नव्हे तर घटनेनंतर रक्ताचे नमुने घेण्यासाठी ससून रुग्णालयात चक्क बाहेरच्या लोकांना प्रवेश देण्यात आल्याची खळबळजनक माहितीदेखील समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने घेताना तेथे चार व्यक्ती उपस्थित होत्या असे समोर आले आहे. ससून रुग्णालयातील नव्हे तर बाहेरच्या लोकांनी आत येऊन रक्ताचे नमुने बदलले. ससून मध्ये संबंधित विभागातील डॉक्टरांनी अल्पवयीन कार चालकाचे ब्लड सँपल घेतले होते. मात्र ऐनवेळी आलेल्या खासगी इसमांनी संबंधित डॉक्टरांवर दबाव टाकत हे ब्लड सँपल बदलण्यास भाग पाडले, असा दावा करण्यात येत आहे. ते लोकं कोणाच्या सांगण्यावरून ते रुग्णालयात आले होते ? रुग्णालयातील डॉक्टरांवर त्यांनी दबाव का टाकला ? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

दरम्यान आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्याचा आरोप असलेले डॉ. अजय तावरे, डॉ श्रीहरी हलनोर आणि घटकांबळे तिघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. पुणे पोलीस आज दुपारी तिघांना कोर्टात करणार हजर आहेत. त्या तिघांनाही काल ससूनमधून निलंबित करण्यात आल्याचे ससूनच्या डीननी जाहीर केलं होतं.

पुणे पोलीस ॲक्शन मोडवर

कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. पुण्यात ड्रिंक अँड ड्राईव्हविरोधात कारवाई सुरू झाली आहे. वाहनचालकांची रात्री कसून चौकशी करण्यात येत आहे. ड्रिंक अँड ड्राइव टेस्टमध्ये मध्ये पॉजिटिव्ह आढळल्यास जागेवर लायसन्स जप्त करून कोर्टाची नोटीस पाठवण्यात येत आहे. पुणे पोलिसांकडून रात्री १२ ते पहाटे ३ पर्यंत कारवाई करण्यात येत आहे.

पोर्श कारची नोंदणी अखेर रद्द

कल्याणीनगरमध्ये ज्या कारची धडक बसून दोघांना जीव गमवावा लागला त्या पोर्श कारची नोंदणी अखेर रद्द झाली आहे. या अपघातातील कारची, बंगळुरी आणि पुण्यातील दोन्ही ठिकाणची नोंदणी आरटीओ कडून रद्द करण्यात आली. अपघात झाला त्यावेळी कारचा स्पीड ताशी 160 प्रति किलोमीटर असल्याचं उघड झालं आहे. वाहतुकीचे नियम मोडल्या प्रकरणे कारवर अखेर कारवाई करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.