AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raigad Crime : संशयाच्या भुताने पछाडलं, फोनवर बोलणाऱ्या प्रेयसीच्या डोक्यातच घातला हातोडा..

रायगडमध्ये प्रेमाच्या नात्यातील संशयाने भयानक रूप धारण केले आहे. प्रेयसी दुसऱ्याशी बोलत असल्याच्या संशयावरून प्रियकराने तिच्यावर लोखंडी हातोड्याने क्रूर हल्ला केला. यात ती गंभीर जखमी झाली.

Raigad Crime : संशयाच्या भुताने पछाडलं, फोनवर बोलणाऱ्या प्रेयसीच्या डोक्यातच घातला हातोडा..
क्राईम न्यूज
| Updated on: Oct 15, 2025 | 11:50 AM
Share

नातं कोणंतही असो प्रियकर-प्रेयसीचं किंवा आणखी कोणी, नात्यात प्रेमासोबतच सर्वात महत्वाचा असतो तो आदर आणि विश्वास. एकमेकांवर विश्वास नसला तर संशयाचं भूत घुसतं आणि तोच भस्मासूर सगळं उद्ध्वस्त करतो. त्याचं जितंजागतं, ताजं आणि तितकंच भयानक उदाहरण रायगडमध्ये घडल्याचे समोर आले आहे. प्रेयसी फक्त फोनवर बोलत होती हे पाहून संशयाने पछाडलेल्या प्रियकराने तिच्या डोक्यात थेट हातोडा घालून तिच्यावर जोरदार हल्ला चढवला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली. मात्र त्यानंतरही विकृत आरोपीचे कृत्य थांबले नाही, त्याने तिला तारांच्या जाळीत ओढून नेऊन आणखीनच मारहाण केली. यामुळे अख्खं गाव हादरला असून विकृत आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

फोनवर बोलताना पाहून केला हल्ला 

मिळालेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील कनकेश्वर मंदिर परिसरात प्रेमाच्या संशयाने हा भयानक प्रकार घडला. सुरज बुरांडे असे आरोपीचे नाव असून त्याने पीडितेवर क्रूर हल्ला केला. लोखंडी हातोड्याने त्याने तिच्या कपाळावर आणि डोक्यावर वार केले.

पीडित मुलगी आणि आरोपी सूरज हे शुक्रवारी सायंकाळी (10 ऑक्टोबर) मंदिराजवळ बसले होते. तेव्हा सूरज याला संशय आला की त्याची संशय आला की प्रेयसी दुसऱ्या तरुणाशी बोलत आहे. या संशयामुळे तो संतापला आणि त्याने अचानक बॅगेतून हातोडा काढून तिच्या डोक्यावर आणि कपाळावर जोरदार वार केले. त्या हल्ल्याने ती गंभीर जखमी झाली. मात्र तिची मदत नकरता आरोपीने तिथेच थांबणे टाळून पीडितेला जवळच्या तार्‍यांच्या जाळीत ओढून नेलं आणि तिथेही दगड घेऊन तिला जबर मारहाण केली.

एवढंच नव्हे पीडित तरुणीला, तशाच जखमी अवस्थेत तिथे तब्बल तीन तास बसवून ठेवण्यात आलं आणि तिला कोणतीही वैद्यकीय मदत देण्यात आली नाही. अखेर ती कशीबशी रुग्णलयात पोहोचली. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत, मात्र तिची प्रकृती अद्याप गंभीर आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर अलिबाग पोलिसांनी आरोपीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी सूरज याला ताब्यात घेतले आहे. अधिक तपास सुरू आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.