AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नघरावर शोककळा, वऱ्हाडाची कार नदीत कोसळली, नवरदेवासह नऊ जणांचा जागीच अंत

अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. एवढ्या मोठ्या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव पथकाच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली

लग्नघरावर शोककळा, वऱ्हाडाची कार नदीत कोसळली, नवरदेवासह नऊ जणांचा जागीच अंत
राजस्थानमध्ये कार अपघातात नऊ जणांचा मृत्यू
| Updated on: Feb 20, 2022 | 11:15 AM
Share

कोटा : लग्न समारंभानंतर घरी जाणारी वऱ्हाडाची गाडी नदीत कोसळून भीषण अपघात (Car Accident) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये नवरदेवासह नऊ जणांना प्राण गमवावे लागले. राजस्थानमधील कोटा (Kota Rajasthan) येथील नयापुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंबळमध्ये शनिवारी रात्री उशिरा हा अंगाचा थरकाप उडवणारा अपघात घडला. एका छोट्या पुलावरुन ही कार नदीत पडल्याची माहिती आहे. चौथ का बरवारा भागातून ही कार कोटा येथे आली होती, तिथून रात्रीच्या सुमारास परत जाताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. यामुळे लग्नघरावर (Groom Death) शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. एवढ्या मोठ्या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव पथकाच्या मदतीने गाडी बाहेर काढण्यात आली. घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा आणि स्थानिकांचा जमाव गोळा झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

लोकसभा अध्यक्षांकडून शोक व्यक्त

दुसरीकडे, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या भीषण अपघाताबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. बिर्ला म्हणाले की, या दुर्दैवी अपघातात इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली जीवितहानी काळजाला घरं पाडत आहे. त्यांच्या अकाली निधनाने मला अतीव दुःख झालं. मृतांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो.

दुसरीकडे, लग्नाचं वऱ्हाड घेऊन निघालेल्या बसवर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला, तर 6 पेक्षा जास्त जणांची प्रकृती गंभीर असून त्यांनी जबर मार लागला आहे. स्कॉर्पिओ कार आणि एका बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडला. बिहारमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली असून लग्नासाठी चाललेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय.

संबंधित बातम्या :

 माझा डोळा लागला, इतक्यात गाडी दाणकन् ट्रकवर आदळली, दीप सिद्धूच्या NRI मैत्रिणीने सांगितला अपघाताचा थरार

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर सात गाड्यांचा विचित्र अपघात, दोन ट्रकमध्ये चिरडलेल्या कारमधील चौघे जागीच ठार

डॉक्टर लेकीसह आई-वडिलांवर काळाचा घाला, अमरावतीच्या कुटुंबाचा उदयपूरमध्ये अपघाती मृत्यू

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.