UP: बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गावकऱ्यांकडून आरोपीला बेदम मारहाण

UP: बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गावकऱ्यांकडून आरोपीला बेदम मारहाण
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या

आरोपी पीडितेच्या घराच्या भिंतीवरुन उडी घेत घरात घुसला आणि दबा धरुन बसला. पीडित मुलगी रात्री बाथरुमला जाण्यासाठी आपला रुमचा दरवाजा खोलून बाहेर आली असता आधीच दबा धरुन बसलेल्या आरोपीने तिच्यावर बंदुक रोखली.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 07, 2022 | 12:13 AM

उत्तर प्रदेश : बंदुकीचा धाक दाखवत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी येथील सैनी कोतवाली भागात घडली आहे. याप्रकरणी सैनी पोलीस ठाण्यात बलात्काराची घटना नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. मुलीच्या वडिलांनी आरडाओरडा केल्यामुळे गावकरी गोळा झाले आणि त्यांनी आरोपीला पकडले. आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

भिंतीवरुन उडी मारुन घरात घुसला आरोपी

आरोपी पीडितेच्या घराच्या भिंतीवरुन उडी घेत घरात घुसला आणि दबा धरुन बसला. पीडित मुलगी रात्री बाथरुमला जाण्यासाठी आपला रुमचा दरवाजा खोलून बाहेर आली असता आधीच दबा धरुन बसलेल्या आरोपीने तिच्यावर बंदुक रोखली. बंदुकीच्या धाकावर आरोपी मुलीला तिच्या रुममध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर बळजबरी केली. यादरम्यान मुलीने आरडाओरडा केला. मुलीचा आरडाओरडा ऐकून वडिलांना जाग आली. त्यांनी जाऊन पाहिले असता आरडाओरडा करण्यास सुरवात केली. वडिलांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जागे झाले.

गावकऱ्यांनी बेदम मारहाण करीत पोलिसांच्या ताब्यात दिले

गावकऱ्यांनी मुलीच्या घराकडे धाव घेत आरोपी तरुणाला घेराव घातला. गावकऱ्यांनी आरोपीला पकडून बेदम मारहाण केली आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी आरोपीकडील अनधिकृत बंदुक जप्त केली आहे. पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध तहरीर नावाचा अर्ज दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

आपण रात्री बाथरूमला जाण्यासाठी दरवाजा उघडला असता बाहेर एक मुलगा बसलेला दिसला. त्याने आपल्या डोक्यावर पिस्तूल रोखले आणि आवाज बंद करण्यास सांगितले आणि तो आपल्याला खोलीत घेऊन गेला. त्यानंतर त्याने आपल्यासोबत चुकीचे कृत्य केले. आपण खूप विरोध केला पण तो ऐकला नाही. त्यानंतर पप्पा लगेच उठले, दार उघडले आणि बाहेर जाऊन ओरडायला लागले. त्यामुळे गावकरीही तेथे आले आणि त्याला पकडले. आम्ही पोलीस ठाण्यात आलो, पोलिस ठाण्यात तक्रार दिली, असे पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

पोलीस पुढील तपास करीत आहेत

पीडितेच्या वडिलांचे म्हणणे आहे की, रात्री तीन वाजता त्यांच्या मुलीवर एका मुलाने बंदुक रोखळी. तिच्यावर बलात्कार केल्यानंतर आपल्यावर एक कट्टा रोखला. पण आपण कसेतरी बाहेर पडून आरडाओरडा केला. त्यानंतर गावातील लोक घटनास्थळी जमा झाले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत असून त्यानुसार पुढील कारवाई करणार, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक समर बहादूर यांनी सांगितले. (Rape of a minor girl in Uttar Pradesh, Accused beaten by villagers)

इतर बातम्या

रश्मी ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट प्रकरणी साडेपाच तासांच्या चौकशीनंतर जितेन गजारीयाची सुटका

मस्ती भोवली! तलवारीने केक कापून दहशत पसरवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी तरुणांना ठोकल्या बेड्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें