सचिन वाझेंचे साथीदार रियाज काझी मुंबई पोलिसातून निलंबित

अँटिलिया स्फोटक प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने रियाझ काझी यांचीही चौकशी केली होती (Riyaz Kazi suspended from Mumbai Police )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:49 PM, 12 Apr 2021
सचिन वाझेंचे साथीदार रियाज काझी मुंबई पोलिसातून निलंबित
रियाझ काझी हे सचिन वाझे यांचे CIU मधील निकटचे सहकारी होते.

मुंबई : सचिन वाझे यांचे साथीदार रियाज काझी यांना मुंबई पोलिस सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकं ठेवल्या प्रकरणी काझींना एनआयएने (NIA) कालच अटक केली होती. त्यानंतर काझींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (Riyaz Kazi aide of Sachin Vaze suspended from Mumbai Police after NIA arrests)

रियाज काझी यांची अनेक वेळा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. अँटिलिया स्फोटक प्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर एनआयएने रियाझ काझी यांचीही चौकशी केली होती. वाझेंच्या अटकेपासूनच काझीही एनआयएच्या रडारवर होते. स्फोटक प्रकरणाच्या कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्यामागे महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे रियाज काझींना अटक केल्याची माहिती आहे.

कोण आहेत एपीआय रियाझ काझी?

रियाझ काझी हे 2010 च्या पीएसआय बॅचमधील पोलीस अधिकारी आहेत. काझी 2010 सालच्या 102 व्या बॅचमधील अधिकारी आहेत. पोलीस दलातील काझी यांची सगळ्यात पहिली पोस्टिंग वर्सोवा पोलीस स्टेशन करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची दुसरी पोस्टिंग अँटी चेन स्नॅचिंग विभागात करण्यात आली.

पीएसआयवरून एपीआय पदावर प्रमोशन झाल्यानंतर रियाझ काझी यांची तिसरी पोस्टिंग मुंबई पोलिसांच्या सीआययू पथकात करण्यात आली. 9 जूनला सचिन वाझेंनी सीआययू पथकाचे इंचार्ज म्हणून पदभार स्वीकारला. तेव्हापासून रियाझ काझी हे सचिन वाझे यांच्यासोबत काम करत होते. वाझे यांच्याशी चांगले संबंध असणारा अधिकारी म्हणून काझी यांची ओळख आहे.

कंगना-ह्रतिकपासून अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास, अर्णब गोस्वामीला घरातून अटक करण्यातही भूमिका

सीआययू पथकाने केलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकरणांच्या तपासात सचिन वाझे यांच्यासोबत एपीआय रियाझ काझी आणि एपीआय होवोळ देखील सहभागी होते. यामध्ये टीआरपी घोटाळ्याचा तपास, डीसी अवंती कार घोटाळा, फेक सोशल मीडिया फॉलोअर्स प्रकरण आणि कंगना हृतिक वाद प्रकरणाचा समावेश आहे. विशेष म्हणजे अर्णब गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक करताना सीआययू युनिटने बजावलेल्या भूमिकेत एपीआय रियाझ काझी यांचाही वाझे यांच्यासोबत सहभाग होता. (Riyaz Kazi suspended from Mumbai Police )

स्फोटकं ठेवण्यात आलेल्या गाड्यांच्या नंबर प्लेट तयार करण्यात एपीआय काझींचा सहभाग असल्याचा आरोप

ज्या गाड्या गुन्ह्यात वापरण्यात आल्या त्यांच्या नंबरप्लेट्स गुन्ह्याच्या दिवशी वारंवार बदलण्यात आल्या होत्या. या नंबरप्लेट्स बनवून घेण्यात एपीआय रियाझ काझी यांचा सहभाग आहे, असा एनआयएचा दावा आहे.

संबंधित बातम्या: 

Riyaz Kazi : वाझेनंतर NIA चौकशी करत असलेले API रियाझ काझी कोण आहेत?

सचिन वाझेंचे साथीदार रियाज काझी मुंबई पोलिसातून निलंबित

(Riyaz Kazi aide of Sachin Vaze suspended from Mumbai Police after NIA arrests)