Drug Seized From Delhi: दिल्लीत दम मारो दम? शाहीन बागेतून 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त

Drug Seized From Delhi: एनसीबीने एका प्रयोगशाळेत हे अमलीपदार्थ तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती संजय कुमार सिंह यांनी दिली.

Drug Seized From Delhi: दिल्लीत दम मारो दम? शाहीन बागेतून 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त
दिल्लीत दम मारो दम? शाहीन बागेत 100 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्तImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 3:01 PM

नवी दिल्ली: एनसीबीने (ncb) दिल्लीच्या (delhi) जामिया नगरमधील शाहीन बाग (shaheen bagh) परिसरात मोठी छापेमारी केली आहे. एनसीबीने या छापेमारीत 50 किलोग्रॅम उच्च प्रतीचे हेरॉईन जप्त केले आहे. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या ड्रग्जची किंमत जवळपास 100 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हा ड्रग्जचा साठा म्हणजे आंतरराष्ट्रीय नेक्ससचा एक भाग आहे. भारत-अफगाणिस्तान तस्करीच्या रॅकेटचा या माध्यमातून भांडाफोड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. एनसीबीचे उप महासंचालक संजय कुमार सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन या बाबतची माहिती दिली. दिल्लीच्या रहविशी परिरसरात ऑपरेशन केलं. त्यात 30 लाखाची रोख रक्कम सापडली आहे. औषधांचे बॅकपार्क आणि बॅगेज ही रक्कम आणि ड्रग्ज लपवले होते. फ्लिपकार्ट आणि अन्य कंपन्यांच्या पाकिटातही हे पैसे आणि ड्रग्स लपवण्यात आले होते, अशी माहिती संजय कुमार सिंह यांनी सांगितलं.

दिल्लीतील ही गेल्या काही दिवसांतील सर्वात मोठी कारवाई आहे. एखाद्या रहिवासी विभागातून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. 47 किलोग्रॅम संदिग्ध अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. एनसीबीने एका प्रयोगशाळेत हे अमलीपदार्थ तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती संजय कुमार सिंह यांनी दिली.

महोरक्या दुबईत

या अमली पदार्थांची तस्करी म्हणजे दिल्लीसह शेजारील राज्यातील भारत अफगाणिस्तान दरम्यानचं सिंडिकेटचं प्रकरण आहे. स्थानिक पातळीवर हेरॉइन बनवणे आणि त्यात भेसळ करण्यात येतात. या सिंडिकेटचा महोरक्या दुबईत राहत असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

अटक झालेला व्यक्ती भारतीय

या प्रकरणात अटक करण्यात आलेला व्यक्ती भारतीय नागरिक आहे. तो शाहीनबागच्या अपार्टमेंटमध्ये कायमस्वरुपी राहत नाही. तो इथे भाड्याने राहत होता, असं त्यांनी सांगितलं. सागरी मार्गाने भारतात तस्करी केली जाते. तसेच सीमेच्या पलिकडूनही तस्करी सुरू असते. वैध माल आणि कार्गोतून ड्रग्जचा सप्लाय केला जात होता, असंही त्यांनी स्पष्यट केलं.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.