जिल्हा बँकेला गंडा घालण्यासाठी लढवली शक्कल, बँकेचा व्हॅल्यूएटरच फुटला !

जिल्हा बँकेने काही दिवसांपूर्वी बँकेत सोने तारण कर्जाअंतर्गत आलेले सोने पुन्हा एकदा तपासले. या तपासणीनंतर बँकेला धक्काच बसला. फसवणुकीसाठी आरोपींनी जी शकक्ल लढवली ती पाहून बँकेचे कर्मचारीही अवाक् झाले.

जिल्हा बँकेला गंडा घालण्यासाठी लढवली शक्कल, बँकेचा व्हॅल्यूएटरच फुटला !
सांगलीत बनावट सोने तारण ठेवत बँकेला गंडाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 11:47 AM

शंकर देवकुळे, सांगली : बनावट सोने गहाण ठेऊन बँकेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जतमध्ये उघडकीस आला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोरडी शाखेत हा प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी कर्जदारांसह सराफ अशा आठ जणांच्या विरोधात बँकेची 25 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बनावट सोने गहाण ठेवून कर्ज काढण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा असाच प्रकार चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या कर्जदाराचे गहाण ठेवलेल्या सोन्यांमध्ये घट आल्याचाही प्रकार घडला होता. त्यामुळे एकूणच जिल्हा बँकेतल्या सोने गहाण कर्ज योजनेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

बँकेच्या व्हॅल्यूएटरशी संगनमत करुन बनावट दागिन्यांद्वारे फसवणूक

सांगली जिल्हा मध्यवती सहकारी बँकेच्या सोरडी शाखेमध्ये गावातल्या सात जणांनी 26 ऑक्टोबर 2022 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान बँकेचे व्हॅल्यूएटर असणाऱ्या सराफ यांच्याशी संगनमत करून, वेगवेगळे सोन्याचे दागिने गहाण ठेवले. बनावट दागिने गहाण ठेवत सुमारे 25 लाख 75 हजार इतके रक्कम कर्ज स्वरूपात घेतले. काही काही दिवसांपूर्वी बँकेच्या तपासणीमध्ये गहाण ठेवण्यात आलेले सोने बनावट असल्याचे बँकेच्या तपासणीमध्ये समोर आले आहे. यानंतर बँकेकडून जत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत सात कर्जदार त्याचबरोबर बँकेचे व्हॅल्यूएटर सराफ यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात कर्मचाऱ्यांकडून प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याला गंडा

पुण्यातील चंदूकाका अँड सन्स सराफा व्यापाऱ्याला कर्मचाऱ्यांनीच गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. अकाऊंट्स विभागात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांनी तब्बल 106 तोळे लंपास केल्याची घटना पुण्यात घडली. याप्रकरणी दोघाही आरोपींना अटक केली आहे. दुकानातील सोने दुसरीकडे गहाण ठेवत त्यातून मिळालेले पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.