AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan Attack : जीपेने पेमेंट करणं भोवलं, नवीन एक्काने नंबर देताच सैफचा हल्लेखोर जाळ्यात, कुठे कुठे फिरला?

सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर आरोपी मोहम्मद शहजादला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गुगल पेने केलेल्या पेमेंटमुळे त्याचा मागमूस लागला. सीसीटीव्ही फुटेज आणि नाश्ता केंद्रातील माहितीचा उपयोग करून पोलिसांनी आरोपीचे ठिकाण शोधून काढले. ठाण्यातील लेबर कॅम्पमधून त्याला अटक करण्यात आली आणि आता पुढील चौकशी सुरू आहे.

Saif Ali Khan Attack : जीपेने पेमेंट करणं भोवलं, नवीन एक्काने नंबर देताच सैफचा हल्लेखोर जाळ्यात, कुठे कुठे फिरला?
| Updated on: Jan 20, 2025 | 11:27 AM
Share

गेल्या आठवड्यात बुधवारी मध्यरात्री अभिनेता सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसलेल्या इसमाने सैफवर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजाद हा अखेर पोलिसांना सापडला असून काल त्याला ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून अटक करण्यात आली. आज त्याची वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये पुन्हा चौकशी केली जाणार असून पोलिस आरोपीला सैफ अली खानच्या घरी पुन्हा एकदा घेऊन जाण्याची शक्यता आहे. क्राइम सीनवर त्या रात्री नेमकं काय आणि कसं घडलं हे जाणून घेण्यासाठी पोलिस आरोपीला पुन्हा तिथे घेऊन जाऊ शकतात.

दरम्यान सैफवर केलेल्या हल्ल्यानंतर आरोपी ठिकठिकाणी फिरत होता, तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं होतं. हल्ल्यानंतरच्या सकाळी आरोपी हा दादरच्या एका मोबाईल शॉपमध्ये हेडफोन्स खरेदी करताना आढळला होता. त्यानंतर तो कबुतरखाना येथे गेला आणि तेथून पुढे तो वरळीच्या सेंच्युरी बाजारला पोहोचला. तिथे एका नाश्त्याच्या स्टॉलवर आरोपी एका व्यक्तीशी बोलत असल्याचं पाहायला सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं होतं. पोलिसानी या नाश्ता सेंटरवाल्याची माहिती मिळवली असता त्याचे नाव नवीन एक्का असल्याचे समोर आले.

जीपेने पेमेंट करणं भोवलं

त्याच नाश्ता सेंटरवर आरोपीने पराठा आणि एक पाण्याची बॉटल घेतली होती, आणि त्याचे पेमेंट त्याने गुगल पेच्या माध्यमातून केले होते. मात्र याच पेमेंटमुळे तो अडकला. कारण आरोपीने ज्या नंबरवरून पेमेंट केले, जीपेने पैसे चुकते केले, आरोपीचा तो नंबरच पोलिसांनी त्या नवीन एक्काकडून मिळवला आणि त्या नंबरचं लोकेशन शोधलं. तांत्रिक बाबीच्या मदतीने आरोपीचे लोकेशन हे ठाण्यातील कासरवडवाली भागातील एका लेबर कॅम्पचे असल्याचे समोर आले. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस सेंचुरी मिल येथील स्टॉलवर पोहचले आणि सर्वांची चौकशी केली. त्यानतंर त्या फोनच्या आधारे लोकेशने शोधून अखेर रविवारी पहाटे पोलिसांनी आरोपी मोहम्मद शहजाद याला अटक केली.

नाश्ता सेंटरच्या मालकाने टीव्ही9शी संवाद साधला. पोलीस आमच्याकडे आले आणि त्याचा व्हिडीओ दाखवला. तो आरोपी आमच्या सेंटरवर 16 तारखेला आला होता, पोलिसांनी त्याचा व्हिडीओ , फोटो दाखवत चौकशी केली. या माणसाला तुम्ही ओळखता का, तो नेहमी येतो का , तो कुठे राहतो, असे अनेक सवाल पोलिसांनी विचारले. त्याने (आरोपीने) ऑनलाइन पेमेंट केलं होतं , मग पोलीस आमच्याकडचं पेटीएम आणि इतर ऑनलाइन ट्रान्झॅक्शनचे रेकॉर्ड्स घेऊन गेले. ते पोलिसांनी चेक केलं,असं त्या मालकाने सांगितलं.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.