Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan Attack : बातम्या पाहिल्या, संशयितांचे फोटोही काढले, सैफचा हल्लेखोर कसा देत होता पोलिसांना चकमा ?

सैफ अली खानवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा आरोपी मोहम्मद शहजाद तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अटक झाली आहे. पोलिसांच्या कसून चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याने अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती, पण सैफचे घर त्याने त्याच्या सोयीस्करतेमुळे निवडले. शहजादच्या मोबाईलवरून संशयितांचे फोटोही सापडले आहेत. तो बातम्यांच्या आधारे पोलिसांना चकमा देत होता.

Saif Ali Khan Attack : बातम्या पाहिल्या, संशयितांचे फोटोही काढले, सैफचा हल्लेखोर कसा देत होता पोलिसांना चकमा ?
सैफ अली खानचा हल्लेखोर कसा देत होता पोलिसांना चकमा ?
Follow us
| Updated on: Jan 20, 2025 | 9:41 AM

अभिनेता सैफ अली खान याच्यावर प्राणघातक हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शहजाद याला 3 दिवसांच्या शोधमोहिमेतनंतर रविवारी पहाटे पोलिसांनी अटक केली. ठाण्यातील लेबर कॅम्प परिसरातून पोलिसांनी काल त्याला अटक केली असून सध्या त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली असून अनेक महत्वाचे खुलासेही झाले आहेत. सैफवर हल्ला केल्यानंतर आरोपी हा मुंबईतच होता, पोलिसांकडून कसून शोधमोहिम सुरू असतानाही त्याने इतके दिवस पोलिसांना चकमा कसा दिला , याचीही माहिती समोर आली आहे.

सैफवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शेहजादच्या मोबाईलमधून संशयितांचे फोटो जप्त करण्यात आले आहेत. या संपूर्ण घटनेच्या बातम्या, पोलिसाचा तपास या गोष्टींची माहिती बातम्यांमध्ये दाखवण्यात येत होती, त्यामुळे आरोपीने वृत्तवाहिन्या दाखवत असलेल्या संशयतांचे स्क्रीनशॉट काढून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीच्या मोबाईल मधून दोन्ही संशयितांचे स्क्रीनशॉट पोलिसांनी जप्त केले आहेत. बातम्यांमधून मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच आरोपी मोहम्मद हा पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होता तसेच बातम्यांच्या माध्यमातून पोलिसांच्या हालचालींची माहिती घेत तो पोलिसांना चकमा देत असल्याचे समोर आले आहे. अखेर तीन दिवसांच्या शोधमोहमिमेनंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले.

अनेक सेलिब्रिटींच्या घराची रेकी, पण शाहरूख, सलमानचं घर का नाही निवडलं ?

हे सुद्धा वाचा

आरोपी मोहम्मद शहजाद हा बांगलादेशी असून त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर केलेल्या चौकशीतून हे सर्व खुलासे होताना दिसत आहेत. त्याने अभिनेता शाहरुख खान, सलमान खान आणि सैफ अली खानच्या घरासह अनेक घरांची रेकी केली होती अशी माहिती नुकतीच समोर आली होती. एका रिक्षातून प्रवास करताना त्याने रिक्षाचालकाकडून हे सेलिब्रिटी कुठे कुठे राहतात, तसेच त्यांच्या घराबद्दलची माहिती मिळवली होती. सगळ्या घरांची माहिती मिळवल्यानंतर अभिनेता सैफ अली खानचे घर आतमध्ये घुसण्यासाठी अधिक सोयीचे वाटल्याने आरोपीने हे घर निवडले. शाहरुख खान आणि सलमान खानच्या घरावरील कडेकोट बंदोबस्त होता आणि सीमा भिंतीच्या उंचीमुळे शहज़ादला चोरी करता आली नाही. शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या बाउंड्री वॉलची उंची जास्त असल्याने त्याला चोरी करता आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. तर अभिनेता सलमान खानच्या घरी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असल्याने शहजादने चोरीची योजना आखली नव्हती,असेही समोर आले आहे.

एम्प्लॉयी ऑफ द ईअरचाही पुरस्कार मिळाला

सैफवर हल्ला करणारा आरोपी शहजाद याने डिसेंबर 2024 पर्यंत ठाण्यातील एका मोठ्या हॉटेलमध्ये काम केले होते. शहजादच्या कामावर खूश होऊन हॉटेलतर्फे नोव्हेंबर महिन्यात त्याला Employee of the year award दिला होता, अशी माहिती समोर आली आहे.

सैफला आज मिळणार डिस्चार्ज ?

घरात घुसलेल्या चोराच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सैफवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून आठवडाभर बेडरेस्टचा सल्ला दिल्याचे डॉक्टरांनी तीन दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं होतं. आज कदाचित सैफला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळण्याची शक्यात आहे. थोड्याच वेळात, साधारण 10 च्या सुमारास डॉक्टर हे सैफ अली खानची पुन्हा तपासणी करणार असून, त्यांच्या जखमांची स्थिती पाहून त्यांना डिस्चार्ज देणार की नाही हे ठरवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली
“त्यांनी राज्याची वाय झेड..”, सुरक्षेवरून राऊत अन् महायुतीमध्ये जुंपली.
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत..
ठाकरेंना मशाल देणाऱ्या शिवसैनिकानं साथ का सोडली? नेत्यांची नावं घेत...
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला
'राऊतांनी कुंभमेळ्यात साबणाचं दुकान...', 'त्या' टीकेवरून मनसेचा टोला.
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं
'..म्हणून काहीही वक्तव्य करणार का?', कोर्टानं रणवीर अलाहबादियाला झापलं.
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत
ठाकरे एकटे पडणार? आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत शहाजीबापू यांचं मोठ भाकीत.
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल
80 प्रवाशांना घेऊन जाणारं प्लेन क्रॅश, लॅडिंगदरम्यानचा व्हिडीओ व्हायरल.
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक
कमाल खानने सर्व मर्यादा ओलांडल्या,'त्या' वादग्रस्त पोस्टवरून CM आक्रमक.
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक
'आता तसं होईल असं वाटत नाही', पक्षाला रामराम अन् मातोश्रीपुढं नतमस्तक.
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला
'माझं लेकरू...', सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटला.
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा
'फडणवीसांनी शिंदेंना एक साबण द्यावा अन्...', संजय राऊतांचा निशाणा.