AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगलीत उपसरपंच निवडणुकीवेळी ग्रामपंचायत सदस्याची हत्या, 39 जणांवर गुन्हे, सात अटकेत

बोरगावातील पांडुरंग काळे (वय 55) या ग्रामपंचायत सदस्याची काल (4 मार्च) हत्या झाली होती. (Sangli Deputy Sarpanch Election Murder)

सांगलीत उपसरपंच निवडणुकीवेळी ग्रामपंचायत सदस्याची हत्या, 39 जणांवर गुन्हे, सात अटकेत
Crime-News
| Updated on: Mar 05, 2021 | 1:35 PM
Share

सांगली : सांगलीमध्ये उपसरपंच निवडणुकीत झालेल्या वादातून झालेल्या भाजपच्या ग्रामपंचायत सदस्याच्या हत्येप्रकरणी सात जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांगलीतील कवठेमहांकाळ पोलिसांनी दोन्ही गटातील जवळपास 39 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगावमध्ये काल उपसरपंच निवडीवेळी मारहाण झाली होती. त्यानंतर बोरगाव गावात आजही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Sangli Kavathe Mahankal Crime Deputy Sarpanch Election BJP Gram Panchayat Member Murder)

भाजपच्या पक्षाच्या सदस्याचा खून

बोरगावातील पांडुरंग काळे (वय 55) या ग्रामपंचायत सदस्याची काल (4 मार्च) हत्या झाली होती. पांडुरंग काळे हे भाजपचे सदस्य असल्याची  प्राथमिक माहिती आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनीच त्यांची हत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. बोरगावमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे 2 जण गंभीर जखमी

उपसरपंच पदाच्या निवडणुकीवरुन झालेल्या मारहाणीत पांडुरंग काळे यांना प्राण गमवावे लागले. यावेळी राष्ट्रवादीचे दोन सदस्य जखमी झाल्याचीही माहिती आहे. पोलिसांकडून या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पांडुरंग काळे यांच्या खून प्रकरणामुळे गाव पातळीवरील ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये होणारं राजकारण कोणत्या पातळीवर पोहोचलं आहे, हे पाहायला मिळत आहे.

भाजप कार्यकर्त्यांवरच हत्येचा आरोप

पांडुरंग काळे यांचा उपसरपंचपदाच्या निवडीच्या वादातून भाजपच्या कार्यकर्त्यांनीच खून केल्याचा आरोप केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः जिल्हा पोलिस प्रमुख घटनास्थळी दाखल झालेले आहेत. काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. (Sangli Kavathe Mahankal Crime Deputy Sarpanch Election BJP Gram Panchayat Member Murder )

औरंगाबादेतही भाजप कार्यकर्त्याची हत्या

जानेवारी महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातील जोडवाडी गावात ग्राम पंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. हरिसिंग गुशिंगे यांच्या हत्येने गावात एकच खळबळ उडाली होती. कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मतदानाच्या धामधुमीत व्यस्त असताना गुशिंगे यांच्या हत्येची बातमी आली होती.

संबंधित बातम्या :

सांगलीत उपसरपंच निवडणुकीत वाद, भाजप कार्यकर्त्यांकडून स्वत:च्याच सदस्याची हत्या, राष्ट्रवादीचा आरोप

ग्रामपंचायत वादातून भाजप कार्यकर्त्याची हत्या; ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

(Sangli Kavathe Mahankal Crime Deputy Sarpanch Election BJP Gram Panchayat Member Murder)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.