Saif Ali Khan : सैफ हल्ला प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीच नाव, माहिती आली समोर
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीच नाव, माहिती समोर आली आहे. हा सैफ अली खान प्रकणातील आरोपी आहे की नाही? हे पोलिसांनी अजून स्पष्ट केलेलं नाही.

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. त्याचं नाव आता समोर आलय. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताच नाव शाहिद आहे, असं पोलिसातील सूत्रांनी सांगितलय. शाहीद याला गिरगाव परिसरातून ताब्यात घेतलय. शाहिदवर या आधी सुद्धा तीन-चार घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. हा सैफ अली खान प्रकणातील आरोपी आहे की नाही? हे पोलिसांनी अजून स्पष्ट केलेलं नाही. पण, आम्ही लवकरच हे प्रकरण उघडकीस आणू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय. मुंबई पोलीस शाहिदची कसून चौकशी करतायत. मुंबईच्या ताडदेव पोलिसांनी फॉकलँड रोडवरील गिरगावमधून त्याला ताब्यात घेतलं.
सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास घरात घुसलेल्या चोराने प्राणघातक हल्ला केला. सैफ या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. चोराने धारदार शस्त्राने त्याच्यावर सहावार केले. यात दोन वार खोलवर होते. पाठिच्या कण्याजवळ जो वार केला, त्यात धारदार तुकडा पाठिमध्ये घुसला होता. सैफला जखमी अवस्थेत लिलावती रुग्णालयात आणलं. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. सैफ अली खानवर जवळपास पाच ते सहा तास ऑपरेशन चाललं. त्याच्यावर दोन ऑपरेशन्स झाली. सैफ अली खानच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नाहीय. पुढच्या काही दिवसात त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.
तो हाच आरोपी आहे का?
पोलीस या प्रकरणात अत्यंत कसून चौकशी करत आहेत. कुठलाही अँगल सुटणार नाही, याची काळजी घेत आहेत. सैफच्या घरात काम करणारे नोकर-चाकर, इमारतीत कामाला येणारे मजूर या सगळ्यांची चौकशी सुरु आहे. CCTV फुटेजमध्ये जो चेहरा दिसला, तो हाच आरोपी आहे का? या बद्दल अजून अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही. सैफच्या घरात हा आरोपी कसा घुसला? घरात घुसण्याची त्याची काही टेक्निक होती का? किंवा सैफच्याच घरातल्या कुठल्या माणसाने त्याला मदत केली? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.