CCTV Video | चुकीच्या दिशेने टर्न घेत ट्रकने बाईकला चिरडलं, अपघाताचा व्हिडीओ समोर

रोहित पाटील

रोहित पाटील | Edited By: अनिश बेंद्रे

Updated on: Jun 16, 2021 | 2:22 PM

चुकीच्या बाजूने टर्न घेऊन ट्रक चालकाने मोटारसायकलला धडक दिली. त्यानंतर चालकाने दुचाकीवरच ट्रक चढवला.

CCTV Video | चुकीच्या दिशेने टर्न घेत ट्रकने बाईकला चिरडलं, अपघाताचा व्हिडीओ समोर
सोलापुरात ट्रक-बाईकचा अपघात

सोलापूर : चुकीच्या दिशेने येऊन ट्रक चालकाने बाईकला धडक दिल्याची घटना सोलापूरमध्ये घडली आहे. धडकेनंतर बाईक ट्रकखाली चिरडली गेली. मात्र सुदैवाने बाईकस्वार वेळेत उतरल्यामुळे त्याचे प्राण बचावले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. (Solapur Truck rams into Bike Rider saved in Accident)

नेमकं काय घडलं?

चुकीच्या बाजूने टर्न घेऊन ट्रक चालकाने मोटारसायकलला धडक दिली. ट्रक चालकाने दुचाकीवरच ट्रक चढवला. दैव बलवत्तर म्हणून बाईकस्वार या अपघातातून बालंबाल बचावला. त्यानंतर त्याने ट्रकचालकाला या प्रकाराचा जाब विचारला. सोलापूर शहरातील जुन्या एम्प्लॉयमेंट चौक परिसरात हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना चौकातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

पाहा व्हिडीओ :

अंबरनाथमध्ये भिंतीवर आदळून बाईकस्वाराचा अपघात

अंबरनाथला राहणारा त्रिंबक काळे हा तरुण रविवारी रात्री त्याच्या दुचाकीवर अंबरनाथहून उल्हासनगरकडे जाण्यासाठी निघाला होता. यावेळी फॉरेस्ट नाक्याच्या पुढे आल्यानंतर रस्त्याच्या मधोमध उभारलेली गोलाकार भिंत न दिसल्यामुळे तो या भिंतीला धडकला आणि त्याचा भीषण अपघात झाला. अपघातात त्रिंबक याचा जबडा अक्षरश: फाटला असून संपूर्ण शरीरावर मोठ्या प्रमाणात दुखापत झाली आहे.

या घटनेनंतर सुरुवातीला त्याच्यावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथे त्याच्यावर तातडीने एक शस्त्रक्रिया करण्यात आली असून येत्या काही दिवसात त्याच्यावर आणखी काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत.

संबंधित बातम्या :

कल्याण-कर्जत महामार्गावरील जीवघेणी भिंत, भीषण अपघातात बाईकस्वाराचा जबडा फाटला

आंबोलीत 24 वर्षीय तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, रिक्षाचालकाचे प्रसंगावधान, दोनशे फूट खोल दरीतून बचाव

(Solapur Truck rams into Bike Rider saved in Accident)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI