AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suspicious Death : पती परदेशात नोकरीला, पत्नीचा सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू; महिलेसोबत नेमके काय घडले?

अचानक शुक्रवारी विभाचा मृत्यू झाल्याचे कळल्याने एकच खळबळ उडाली. विभाच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्यांवर तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. तसेच तिचा दिर तिला नेहमी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी द्यायचा.

Suspicious Death : पती परदेशात नोकरीला, पत्नीचा सासरच्या घरी संशयास्पद मृत्यू; महिलेसोबत नेमके काय घडले?
पैशाच्या वादातून अल्पवयीन मुलाला मित्रांनी संपवलेImage Credit source: Google
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jan 14, 2023 | 5:57 PM
Share

मुझफ्फरपूर : विवाहितेच्या संशयास्पद मृत्यू झाल्याने बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा पती परदेशात नोकरीला असतो. महिला आपल्या तीन मुलांसह सासरच्या लोकांसोबत राहत होती. महिलेच्या गळ्यावर फासाचे व्रण असल्याने तिच्या नातेवाईकांनी सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप केला आहे. विभा देवी असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच सत्य समोर येईल. सध्या पोलीस नातेवाईकांचे जबाब नोंदवत आहेत.

महिलेचा पती कामानिमित्त परदेशी असतो

रतनौली येथील राजीव ठाकूर परदेशात नोकरी करतो. त्याची पत्नी विभा देवी आणि तीन मुलं त्याच्या कुटुंबीयांसोबत रतनौली गावात राहतात. मात्र कुटुंबातील लोक पतीच्या अनुपस्थितीत विभाचा खूप छळ करायचे. विभाला नेहमी मारहाण करायचे. लहान दिरही तिला खूप मारहाण करायचा.

महिलेच्या नातेवाईकांकडून हत्येचा आरोप

अचानक शुक्रवारी विभाचा मृत्यू झाल्याचे कळल्याने एकच खळबळ उडाली. विभाच्या नातेवाईकांनी तिच्या सासरच्यांवर तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. तसेच तिचा दिर तिला नेहमी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी द्यायचा.

पोलिसांकडून अधिक तपास सुरु

महिलेच्या मृत्यूची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.

उत्तर प्रदेशात हुंड्यासाठी नवविवाहितेची हत्या

हुंड्यासाठी एका नवविवाहितेचा छळ करुन तिची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार आरोपी पती आणि सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?