AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल हिसकावताना विरोध, टोळक्याने 25 वर्षीय तरुणाचं मुंडकं छाटलं

दारु पीत बसले असताना अचानक तीन मोटारसायकलवरून आलेल्या टोळक्याने चाकूचा धाक दाखवला. त्यांनी सतीशचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिकार केला. त्यामुळे आरोपींनी विळा काढून त्याचा शिरच्छेद केला.

मोबाईल हिसकावताना विरोध, टोळक्याने 25 वर्षीय तरुणाचं मुंडकं छाटलं
सांकेतिक छायाचित्र
| Edited By: | Updated on: Feb 15, 2022 | 2:28 PM
Share

चेन्नई : 25 वर्षीय तरुणाचा शिरच्छेद (Youth Behead) करणाऱ्या टोळीच्या मागावर पोलीस आहेत. मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना (Mobile Theft) विरोध केल्यामुळे चोरट्यांच्या टोळीने रविवारी एका तरुणाचा शिरच्छेद केला होता. तामिळनाडूतील (Tamilnadu Crime) तिरुपूरमध्ये हा प्रकार घडला. या टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी तिरुपूर पोलिसांनी सोमवारी चार विशेष पथके तयार केली आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोलिसांना मयत युवकाची ओळख पटली आहे. मयिलादुथुराई येथील कोनाराजापुरममधील रहिवासी असलेल्या एम सतीश याला या घटनेत प्राण गमवावे लागले. तो सेरांगाडू येथील एम्ब्रॉयडरी युनिटमध्ये काम करत होता.

काय आहे प्रकरण?

एम सतीश हा रणजीत नावाच्या मित्रासोबत तिरुपूर येथे एक खोली भाड्याने घेऊन राहत होता. ही जागा त्यांच्या कामाच्या ठिकाणाजवळ होती. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने दोघे रुममेट्स सतीश आणि रणजीत एका खासगी शाळेजवळील रिकाम्या प्लॉटवर दारु पिण्यासाठी गेले.

नेमकं काय घडलं?

ते दारु पीत बसले असताना अचानक तीन मोटारसायकलवरून आलेल्या टोळक्याने दोघांना चाकूचा धाक दाखवला. त्यांनी सतीशचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने प्रतिकार केला. त्यामुळे आरोपींनी विळा काढून त्याचा शिरच्छेद केला. इतकंच नाही, तर त्यांनी सतीशचं कापलेले शीर घेऊन तिथून पळ काढला.

रणजीत धावत मुख्य रस्त्यावर पोहोचला आणि तिथून ये-जा करणाऱ्यांची त्याने मदत घेतली. सतीशला उपचारासाठी तिरुपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले. रणजीतवरही त्रिचीमध्ये काही गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत.

तिरुपूरचे आयुक्त एजी बाबू यांनी चार विशेष पथकांना गुन्हेगारांना अटक करण्याचे आणि मृत व्यक्तीचे कापलेले डोके परत मिळवण्याचे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या :

चहा बनवताना लेकीचं डोकं उडवलं, छाटलेल्या मुंडक्यासह आई-भावाचा सेल्फी, औरंगाबादेत थरार

कीर्ती आनंदाने बिलगली, मात्र भावाने डोकं उडवल्यावर आई छाटलेल्या मुंडक्यालाही शिव्या घालत राहिली

विळ्याने डोकं उडवून जन्मदात्रीची हत्या, आरोपीविरुद्ध पत्नीचीही साक्ष, पाताळयंत्री मुलाला फाशीची शिक्षा

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.