हैदराबाद : जिभेचे चोचले न पुरवणाऱ्या बायकोविरोधात (Husband Wife) नवऱ्याने थेट पोलिसात धाव घेतली. बायको आपला आवडीचा मटण रस्सा (Mutton Curry) रात्रीच्या जेवणात बनवत नसल्याने नवरा चांगलाच चिडला. अखेर त्याने तेलंगणातील (Telangana) नालगोंडा पोलिसांच्या 100 नंबर पोलीस हेल्पलाईनवर वारंवार कॉल केले. याबद्दल आरोपी पती नवीन याला पोलिसांनी अटक केली आहे होळीच्या रात्री म्हणजे शुक्रवार 18 मार्च रोजी ही घटना घडली. पत्नीने मटण करी तयार केली नाही, म्हणून नवीनला राग आला. वाद झाल्यानंतर त्याने 100 नंबर डायल करून पोलिसांना फोन केला होता.