AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : चुलत बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात, म्हशीमागे गेल्या अन्…. जे घडलं त्याने गाव हादरलं

प्रेमात कधी काय होईल काही सांगता येत नाही. एकाच मुलावर दोन बहिणींचं प्रेम झालं होतं. दोघींमध्ये अनेकदा यावरून वाद होत होते. मात्र एक दिवस दोघी म्हशी चारण्यासाठी गेल्या अन् तिथे असं काही घडलं ज्यामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं आहे.

Crime : चुलत बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात, म्हशीमागे गेल्या अन्.... जे घडलं त्याने गाव हादरलं
love affair
| Updated on: Aug 20, 2024 | 12:02 AM
Share

प्रेमामध्ये कोण काय करेल हे सांगणे फार जास्त कठीण आहे. अशी एक अत्यंत धक्कादायक घटना घडलीये. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळतंय. चुलत बहिणीनेच आपल्या बहिणी हत्या केली. समज देऊनही बहिण ऐकत नसल्याने अखेर दुसऱ्या बहिणीने आपल्या रस्त्यातील काटा काढत चुलत बहिणीची हत्या केली. घडलेली संपूर्ण घटना ऐकल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली. विशेष म्हणजे पोलिसांनी तीन तासांमध्ये हत्येचे रहस्य उघड केले.

राजस्थानमधील केकडी येथे हैराण करणारी घडना घडलीये. हे सर्व प्रकरण प्रेम प्रकरणातून घडल्याचे उघडकीस आले. दोन्ही चुलत बहिणी एकाच मुलाच्या प्रेमात पडल्या. आरोपी तरुणी मृत बहिणीला सतत आपल्या बॉयफ्रेंडपासून दूर राहण्यास सांगत होती. मात्र, काहीही करून बहिणी आपल्या बॉयफ्रेंडपासून दूर राहत नसल्याचे आरोपी बहिणीच्या लक्षात आले.

आरोपी बहिणीने पोलिसांना सांगितले की, मी तिला शंभर वेळा सांगितले होते की, माझ्या बॉयफ्रेंडपासून दूर राहा. पण तिला समजतच नव्हते. मी नसताना ती सतत माझ्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलत होती. हेच नाही तर त्याच्याशी जवळीकता वाढवत होती. घरामध्येही ती यावरून मला बोलत होती. मला तिला मारायचे नव्हते, पण मी तिला काय सांगत होते ते तिला कळतच नव्हते.

15 ऑगस्टला आम्ही दोघी नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी शेतात गेलो होतो. यावेळी आमच्या दोघींमध्ये बॉयफ्रेंडवरून वाद झाला. ती माझे अजिबातच ऐकत नव्हती. यावेळी माझा राग इतका जास्त अनावर झाला की, मी काठीने तिला मागून जोरात मारले आणि लगेचच ती जमिनीवर पडली. नेमके काय घडले, याची संपूर्ण माहिती ही आरोपी बहिणीने दिलीये.

या प्रकारानंतर यांच्या घरच्यांचा पायाखालची जमिन सरकली आहे. हेच नाही तर पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये गुन्हा कबुल करून घेतलाय. मात्र, प्रेमासाठी दोन्ही बहिणी कोणत्या टोकाला गेल्या याची आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. या खळबळजनक घटनेनंतर संपूर्ण गावामध्ये एक चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.