UP Murder : शाळेत जाण्यासाठी घरुन निघाली चिमुरडी, काही तासांनी गोणीत भरलेला मृतदेह आढळला, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावातीलच प्राथमिक शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 10 वाजता ती शाळे जाण्यासाठी घरून निघाली. मात्र घरी परतलीच नाही.

UP Murder : शाळेत जाण्यासाठी घरुन निघाली चिमुरडी, काही तासांनी गोणीत भरलेला मृतदेह आढळला, उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना
तांत्रिकाकडून अल्पवयीन मुलीवर बळजबरी करण्याचा प्रयत्न
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 13, 2022 | 7:06 PM

उत्तर प्रदेश : घरातून शाळेत जाण्यासाठी निघालेली 6 वर्षाची चिमुरडी अचानक बेपत्ता (Missing) होत तिचा मृतदेह (Deadbody) आढळल्याची घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मुलगी शाळेत जाण्यासाठी घरून निघाली होती आणि परत आलीच नाही. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला असता तिचा मृतदेह गोणीत भरलेला आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी तीन संशयितांनाही ताब्यात (Detained) घेतले असून, त्यांची चौकशी सुरू आहे.

गावातील एका घरात गोणीत मृतदेह सापडला

उत्तर प्रदेशातील कल्याणपूरच्या दौलतपूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. फतेहपूरचे एसपी राजेश सिंह यांनी सांगितले की, वडिलांनी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मुलीचा शोध सुरू केला. बरीच शोधाशोध केल्यानंतर गावातीलच एका घरातून मुलीचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह गोणीत भरलेला होता. मुलीच्या डोक्यावर जखमा आढळल्या. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनीही बलात्काराची शंकाही व्यक्त केली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच याची पुष्टी होणार आहे.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी गावातीलच प्राथमिक शाळेत दुसऱ्या इयत्तेत शिकत होती. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 10 वाजता ती शाळे जाण्यासाठी घरून निघाली. मात्र घरी परतलीच नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी तिची शोधाशोध सुरु केली. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. (The suspicious body of another student was found in Uttar Pradesh)

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें