तरुणीने केला तरुणीवर बलात्कार; मोबाईलवर व्हिडिओ देखील बनवला आणि…

पीडित आणि आरोपी तरुणीची फेसबुकद्वारे एकमेकींशी ओळख झाली होती. आरोपी तरुणीने पीडित तरुणीला चित्रपटात काम करून देण्याच्या बहाण्याने आपल्यासोबत ग्वाल्हेरला नेले. यानंतर दहा दिवस तिला एका ठिकाणी कैद करुन ठेवले. या दरम्यान आरोपी तरुणीनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला. तसेच या गैर कृत्याचे तिने व्हिडिओ देखील बनवला.

तरुणीने केला तरुणीवर बलात्कार; मोबाईलवर व्हिडिओ देखील बनवला आणि...
वनिता कांबळे

|

Jul 01, 2022 | 3:52 PM

गोरखपूर : बलात्काराच्या घटना तर सातत्याने घडत असतात. मात्र, उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीने दुसऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. आरोपी तरुणीने बलात्कार करतानाचा व्हिडिओ देखील बनवला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

पीडित आणि आरोपी तरुणीची फेसबुकद्वारे एकमेकींशी ओळख झाली होती. आरोपी तरुणीने पीडित तरुणीला चित्रपटात काम करून देण्याच्या बहाण्याने आपल्यासोबत ग्वाल्हेरला नेले. यानंतर दहा दिवस तिला एका ठिकाणी कैद करुन ठेवले. या दरम्यान आरोपी तरुणीनी पीडितेवर वारंवार बलात्कार केला. तसेच या गैर कृत्याचे तिने व्हिडिओ देखील बनवला.

फेसबुकच्या माध्यमातून झाली मैत्री

पीडित तरुणी ही गोरखपूर जिल्ह्यात राहणारी आहे. तरुण आरोपी तरुणी ग्वाल्हेरमध्येच राहते. या दोघींची ओळख फेसबुकच्या माध्यमातून झाली. यानंतर त्यांच्याच फेसबुकवर चॅटिंग सुरु झाले. यानंतर आरोपी तरुणीने या मुलीचा फोन नंबर घेतला. यानंतर यांच्या फोनवर संभाषण सुरु झाले. आरोपी तरुणीने पीजितेला. चित्रपटात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यानंतर तिला ग्वाल्हेरला बोलावले.

अशी केली पिडीत तरुणीने स्वत:ची सुटका

आरोपीने तिच्यावर अत्याचार करत त्याची व्हिडिओ क्लीप बनवली. यानंतर पीडितेला समजले की आरोपी तरुणी खूप मोठे रॅकेट चावलत आहे. आरोपी तरुणी अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत त्यांच्यावर अशाच प्रकारचे अत्याचार करत असल्याचे लक्षात आले. मोठ्या मुश्किलनेपीडित तरुणीने आपल्या कुटूंबियांशू संपर्क साधला. यानंतर पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली.

पोलिसांनी आरोपी तरुणीला अटक केली आहे. आरोपी तरुणी फेसबुकच्या माध्यमातून अनेक तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत होती. तसेच त्यांच्यासौबत गैरकृत्य करुण त्याचे चित्रीकरण करत होती. अशी माहिची पोलिसांनी दिली.

जन्मदात्या पित्याने पोटच्या लेकीला प्रेग्नंट केलं

जन्मदात्या पित्यानेच पोटच्या लेकीला प्रेग्नंट केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील( Uttar Pradesh ) अमरोहा येथे घडली आहे. पत्नीच्या निधनानंतर या पित्याने मुलीवरच बालात्कार (Father Raped ) केला. यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. पोलिसांनी वेगाने तपास करत नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करत कोर्टात केस उभी केली. यानंतर कोर्टाने आरोपी वडिलाला १४ दिवसांत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच ५३ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें