Karad ATM Theft : कराडमध्ये जिलेटीनचा स्फोट घडवून एटीएम फोडण्याचा चोरट्यांची प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्लान फसला

कराडजवळील गजानन हाउसिंग सोसायटी येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये मध्यरात्री चार चोरटे चोरी करत होते. कराड पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि चोरट्यांमध्ये झटापट झाली.

Karad ATM Theft : कराडमध्ये जिलेटीनचा स्फोट घडवून एटीएम फोडण्याचा चोरट्यांची प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे प्लान फसला
olx वर चोरीच्या गाड्या विकणारी दुकली गजाआडImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 5:36 PM

कराड : चोरी करण्यासाठी चोरट्यांनी एटीएम (ATM)मध्ये सक्रिय करुन ठेवलेल्या जिलेटीनचा बॉम्ब शोधक (Bomb Squad) पथकाने तेथेच स्फोट (Blast) घडवून निकामी केले. कराडमध्ये बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये ही घटना घडली. एटीएममध्ये 8 लाख 59 हजार रुपये रोकड होती. स्फोटात काही प्रमाणात नोटांचे नुकसान झाले आहे मात्र उर्वरित रक्कम सुरक्षित आहे. जिलेटीन मोठ्या क्षमतेचे असल्याने मोठा स्फोट झाला, त्यामुळे परिसर दणणाला. चोरटे सराईत असून त्यांच्याजवळ चार पेट्रोल बॉम्ब आढळून आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.

एटीएममध्ये चोरी करण्यासाठी आले होते चोरटे

कराडजवळील गजानन हाउसिंग सोसायटी येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये मध्यरात्री चार चोरटे चोरी करण्यासाठी आले होते. एटीएम फोडण्यासाठी चोरट्यांनी जिलेटीन लावले होते. जिलेटीनचा स्फोट घडवून एटीएम फोडायचे आणि रोकड चोरण्याची योजना चोरट्यांनी आखळी होती. मात्र कराड पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि चोरट्यांमध्ये झटापट झाली. डोळ्यात स्प्रे गेल्याने पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांच्या डोळ्यात स्प्रे फवारून तिघे जण फरार झाले तर एकाला पकडण्यात यश आले. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. पकडलेल्या चोरट्यांकडून एटीएम मशिनमध्ये जिलेटीन सक्रिय करुन ठेवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले. या पथकाने जिलेटीनचा त्याच एटीएममध्ये स्फोट केला आणि जिलेटीन निकामी केले. (Thieves plan to steal an ATM failed in Karada, gelatin exploded)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.