राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हत्या प्रकरण, दोघा आरोपींना अटक

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे यांच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हत्या प्रकरण, दोघा आरोपींना अटक
बारामतीतील पानसरे हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 8:29 PM

बारामती : राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मेहबूब पानसरे हत्या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. जमिनीच्या वादातून कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करत पानसरे यांची हत्या केली होती. किरण परदेशी या महिलेसह तिचा मुलगा स्वामी परदेशी याला अटक केली आहे. सासवड न्यायालयाने दोघांनाही 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. जेजुरी पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पानसरे यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ माजली आहे. पानसरे हे सुप्रिया सुळेंचे निकटवर्तीय मानले जातात.

जमिनीवरुन चार वर्षापासून सुरु होता वाद

पानसरे यांनी चार वर्षांपूर्वी नाझरे जलशयानजीक जमीन खरेदी केली होती. या जमिनीवरुन परदेशी आणि पानसरे यांच्यात वाद होता. काल सायंकाळच्या सुमारास परदेशी जमिनीत ट्रॅक्टरच्या साहाय्याने नांगरणी करत होते. यावेळी मेहबूबभाई पानसरे हे पुतण्या राजू फिरोज पानसरे आणि साजिद युनूस मुलानी यांच्यासह तेथे गेले. पानसरे नांगरणी करू नये, कायदेशीर वाद मिटल्यावर जे करायचे ते करा, असे परदेशी यांना सांगितले. तसेच नांगरणी थांबवण्याचा प्रयत्न केला.

उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू

यावेळी आरोपी वणेश प्रल्हाद परदेशी, महिला आरोपी किरण वणेश परदेशी, स्वामी वणेश परदेशी, काका परदेशी आणि एका अनोळखी इसम यांची परदेशी यांच्याशी बाचाबाची सुरू केली. वादावागीत आरोपी वणेश याने मेहबूबभाई पानसरे यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. इतर आरोपींनीही कोयता आणि पहारीने पानसरे यांच्या डोक्यावर मानेवर, पाठीवर दहा ते पंधरा वार केले. पानसरे यांना तात्काळ पुणे येथे हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. घटनेवेळी भांडण सोडवायला गेलेल्या पानसरे यांचा पुतण्या आणि अन्य इसमावरही आरोपींनी हल्ला केला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.