AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 Team India : आर या पार.. टीम इंडियाच्या खेळाडूंवर टांगती तलवार ! सेमी फायनलचं तिकीट गमावलं तर खेळ खल्लास..

भारतीय संघ आज (26 फेब्रुवारी) झिम्बाब्वेविरुद्ध सुपर-8 स्टेजमध्ये सामना खेळणार आहे. आजचा सामना जिंकणं हे भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे, एवढंच नव्हे तर दक्षिणआफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव रावा अशी प्रार्थनाही चाहते आणि खेळाडू करत असतील, तर टीम इंडियाच्या आशा कायम राहतील. पण जर आज टीम इंडियचा पराभव झाला आणि संघ सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर प़डला तर अनेक खेळाडूंच भविष्य धोक्यात येऊ शकतं.

T20 World Cup 2026 Team India : आर या पार..  टीम इंडियाच्या खेळाडूंवर टांगती तलवार ! सेमी फायनलचं तिकीट गमावलं तर खेळ खल्लास..
टीम इंडियाच्या खेळाडूंवर टांगती तलवार
| Updated on: Feb 26, 2026 | 12:32 PM
Share

दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज याच्याकडून हरल्यानंतर भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघासाठी आजचा ( 26 फेब्रवारी) चेन्नईतला सामना अत्यंत महत्वाचा आहे. ग्रुप 1 चा सुपर 8 स्टेजमधील सामना करो या मरो असा ठरताना दिसणार आहे. चेन्नईतील चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात विजय मिळवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल , तसं झालं तरच त्यांच्या सेमीफायनलमध्ये टिकून राहण्याची शक्यता असेल. मात्र या समन्यात भारतावर तर वेगळ्याच प्रकारचा दबाव आहे.

वेस्ट इंडिजच्या पराभवावर भारताचं भवितव्य अवलंबून

भारतीय संघाला हा सामना तर जिंकावा लागेलच, पण आजच्याच दिवशी दुपारी होणाऱ्या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला हरवावा अशीच आशाही भारतीय खेळाडू आणि चाहत्यांना असेल. त्यानंतर टीम इडियाकडून वेस्ट इंडिजचा पराभव झाला पाहिजे. कारण वेस्ट इंडिजचा नेट रन रेट पेक्षा जास्त आहे. दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट +3.800 आहे.

भारतीय संघ टी 20 वर्ल्डपचा गतविजेता असल्याने आणि घरच्याच मैदानावर खेळत असल्याने टीम इंडियावर दुहेरी दबाव आहे. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारताचा नेट रन रेट -3.800 आहे. त्यामुळे, आजचा सामना आपल्या बाजून वळावा, विजय मिळावा अशीच सूर्या ब्रिगेडची इच्छा असेल. वेस्ट इंडिजने आफ्रिकेवर विजय मिळवला तर भारताचे उपांत्य फेरीचे समीकरण बिघडू शकतं.

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सुपर 8 चा सामना आज दुपारी 3 वाजता अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना दोन गुणांसाठी असेल. पण अहमदाबादपासून जवळजवळ 2000 किलोमीटर अंतरावर असलेल्या चेन्नई येथे भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांचे या सामन्यावर बारकाईने लक्ष असेल.

आज पॅकअप झाल्यास, या खेळाडूंचं भविष्य धोक्यात

मात्र, जर आज भारतीय संघात गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडल्या नाहीत, तर अनेक खेळाडूंचं टी-20 करिअर धोक्यात येऊ शकतं, कारण त्यांची जागा घेण्यासाठी बेंचवर भरपूर पर्याय उपलब्ध आहेत.

1) अभ‍िषेक शर्मा : सध्या भारतात ज्याच्यावर सर्वात जास्त टीका होते, तो खेळाडू म्हणजे अभिषेक शर्मा. 2026 च्या टी-20 वर्ल्डकमध्ये त्याने चार सामन्यात फक्त 15 धावा केल्या आहेत. धावा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या त्याच्या शेवटच्या टी-20 सामन्यात त्याने हाँ स्कोर केला होता. त्याने पहिल्या टी20 मध्ये तीन वेळा शून्य धावा काढल्या. अभिषेक शर्मा सध्या टी20 क्रमवारीत नंबर 1 फलंदाज आहे, पण त्याच्या अलीकडील फॉर्ममुळे टीम इंडियासाठी चिंता वाढली आहे.

1 जानेवारी 2025 पासून आतापर्यंतच्या टी-20० आकडेवारीवर नजर टाकल्यास, अभिषेक शर्मा हा भारतीय संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. आतापर्यंत त्याने 30 सामन्यांच्या 30 डावांमध्ये 37.71 च्या सरासरीने आणि 196.64 च्या स्ट्राईक रेटने 1056 धावा केल्या आहेत. पण या वर्ल्डकपमध्ये तो भारतीय संघाचा हा सर्वात कमकुवत दुवा आहे, हे नाकारता येत नाही.

यापुढे जर अभिषेक अपयशी ठरला तर यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी हे त्याचे पर्याय आहेत. वैभव 27 मार्च रोजी वरिष्ठ भारतीय संघात निवडीसाठी पात्र ठरेल. वैभव सध्या 14 वर्षांचा आहे आणि आयसीसीच्या नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूचे किमान वय 15 वर्षे असणे आवश्यक आहे.

2) त‍िलक वर्मा : सध्या चालू असलेल्या टी- 20 वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाच्या डावात तिलक वर्मा हाही एक कमकुवत दुवा आहे. तो संघाच्या सर्वात मजबूत क्रमांक तिसऱ्या स्थानावर खेळतो. त्याने पाच डावांमध्ये 21.40 च्या सरासरीने आणि 118.88 च्या स्ट्राइकिंग रेटने 107 धावा केल्या. पण तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजासाठी ही. त्याची जागा घेण्यासाठी श्रेयस अय्यरसारखे फलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शॉट खेळताना बाद झाल्याबद्दल सुनील गावस्कर यांनीही वर्मावर टीका केली होती.

3) र‍िंकू सिंह : टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये रिंकू सिंहने 5 मॅचमध्ये 29 बॉल खेलत फक्त 24 धावा केल्यात. रिंकूने अमेरिकेविरुद्ध 14 चेंडूत 6 धावा, नामिबियाविरुद्ध 6 चेंडूत 1 धाव, पाकिस्तानविरुद्ध 4 चेंडूत 11 नाबाद आणि नेदरलँड्सविरुद्ध 3 चेंडूत 6 नाबाद धावा केल्या. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन चेंडू खेळला पण त्याचे एकही धाव न करताच बाद झाला. तथापि, काही क्रिकेट तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की रिंकूला जास्त संधी मिळालेली नाही, म्हणून त्याच्यावर प्रश्न उपस्थित करणं अन्याय्य कारक आहे. संघात असे बरेच खेळाडू आहेत जे त्याची जागा घेऊ शकतात.

4) सूर्यकुमार यादव : सूर्यकुमार यादव हा या टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचा कर्णधार आहे. पण ज्या फॉर्मसाठी तो ओळखला जातो, तो सध्या दिसत नाही. जर आता भारतीय संघ वर्ल्डकपमधून बाहेर पडला तर 35 वर्षीय सूर्याची कारकीर्द थांबू शकते.

या विश्वचषकात सूर्या भारतीय संघाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असू शकतो. सूर्याने 5 सामन्यांमध्ये 5 डावांमध्ये 180 धावा केल्या आहेत, एकदा तो 45.00 च्या सरासरीने आणि 127.65 च्या स्ट्राईक रेटने नाबाद राहिला. 84 नाबाद ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती, अमेरिकेविरुद्ध त्याने ही खेळी केली होती. पण सूर्याचा कारकिर्दीतील (टी-२० आंतरराष्ट्रीय स्ट्राईक रेट) 162.77 इतका आहे आणि सरासरी 37.32 आहे, पण वर्ल्कपमध्ये त्याची खेळी साजेशी झालेली नाही.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...