AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 21 महिलांवर बलात्कार अन् हत्या, अंतर्वस्त्रांची चोरी करणाऱ्या उमेश रेड्डीची थरकाप उडवणारी कथा, शिक्षाही तशीच !

हा खुनी कर्नाटकमधील असून तो महिलांचा बलात्कार करुन त्यांची हत्या करत असे. विशेष म्हणजे त्याला अटक रेल्यानंतर त्याच्या बॅगमध्ये महिलांचे अंतर्वस्त्र तसेच साडी असं सामान सापडलं होतं. सध्या त्याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

तब्बल 21 महिलांवर बलात्कार अन् हत्या, अंतर्वस्त्रांची चोरी करणाऱ्या उमेश रेड्डीची थरकाप उडवणारी कथा, शिक्षाही तशीच !
umesh reddy
| Edited By: | Updated on: Sep 29, 2021 | 6:26 PM
Share

बंगळुरु : गुन्हेगारी विश्व हे अतिशय भयानक आणि विचित्र आहे. येथे भावना, मानवता तसेच संवेदनांना थारा नसतो. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे लोकांची हत्या करणारे क्रुर आरोपी पाहिले असतील. पण सध्या अशा एका आरोपीची चर्चा होत आहे, ज्याची कहाणी ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. हा खुनी कर्नाटकमधील असून तो महिलांचा बलात्कार करुन त्यांची हत्या करत असे. विशेष म्हणजे त्याला अटक केल्यानंतर त्याच्या बॅगमध्ये महिलांचे अंतर्वस्त्र तसेच साडी असं सामान सापडलं होतं. सध्या त्याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. (umesh reddy rape 21 women and kill them sentenced to death by supreme court in karnataka)

आरोपी उमेश रेड्डी होता सीआरपीएमध्ये नोकरीवर

महिलांवर बलात्कार करुन त्यांची हत्या करणाऱ्या या आरोपीचे नाव उमेश रेड्डी असून तो मूळचा कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील आहे. 1969 साली त्याचा जन्म झाला. मोठा झाल्यानंतर तो सीआरपीएमध्ये कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला. उमेशची पहिली पोस्टिंग जम्मू-काश्मीरमध्ये झाली होती. पुढे 1996 मध्ये त्याच्यावर बलात्काराचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे त्याच वर्षी त्याने आणखी एका तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. याच हत्येनंतर उमेश रेड्डी हा खुनी बनला. पुढे त्याने कित्येक महिलांवर बलात्कार केले. तर कित्येक महिलांची हत्या केली.

21 महिलांवर बलात्कार अन् हत्या

उमेशमधील क्रुरता काळानुसार वाढत गेली होती. 2002 पर्यंत त्याच्यावर देशातील अनेक शहरांमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये बंगळुरु, म्हैसुर, अहमदाबाद, मुंबई, बडोदा अशा मोठ्या शहरांमध्येदेखील रेड्डीने आपली दहशत माजवली होती. त्याच्यावर 21 महिलांवर बलात्कार तसेच हत्येचा गुन्हा वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आला होता. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यानंतर संपूर्ण भारतात त्याला क्रुर खुनी म्हणून ओळखले जाऊ लागले.

हात बांधून बलात्कार, नंतर हत्या  

उमेश रेड्डीची दहशत वाढल्यानंतर देशभरातील पोलीस त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी त्याला यशवंतपूर येथून अटक करण्यात आली होती. ज्यावेळी त्याला अटक करण्यात आलं होतं, त्यावेळी त्याच्याजवळ अनेक संशयास्पद गोष्टी सापडल्या होत्या. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. आरोपी तरुणी तसेच महिलांना चाकुचा धाक दाखवित असे. त्यानंतर त्यांचे हात बांधून बलात्कार तसेच त्यांची हत्या करीत असे. पोलिसांनी त्याला जेव्हा अटक केली तेव्हा त्याच्याजवळ महिलांचे अंतर्वस्त्र सापडले होते. महिलांची हत्या करुन तो त्यांच्या अतर्वस्त्त्रांची चोरी करत असावा असादेखील त्याच्यावर आरोप होता. उमेश रेड्डीला उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. हीच शिक्षा पुढे सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.

इतर बातम्या :

डोंबिवली बलात्कार प्रकरण, 22 आरोपींच्या कोठडीत वाढ, कोर्टात हजर करताना पोलिसांचा कडक बंदोबस्त

सासरच्यांना भेटून आला, रात्री उशिरापर्यंत गावकऱ्यांसोबत गप्पा, सकाळी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत, घरातल्या पाच जणांचा रहस्यमय मृत्यू

नागपूरच्या गजबजलेल्या मार्केट परिसरात देहविक्रीचा धंदा, लॉजवर पोलिसांचा सापळा, अखेर तरुणीचा सुटका, आरोपीला बेड्या

(umesh reddy rape 21 women and kill them sentenced to death by supreme court in karnataka)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.