अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ग्रॅज्युएशन परीक्षा देणार, पदवी प्रमाणपत्र दगडी चाळीच्या भिंतीवर लागणार

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी लवकरच पदवीचं शिक्षण पूर्ण करणार आहे. अरुण गवळी सध्या नागपुर कारागृहातून शिक्षण घेत आहे.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ग्रॅज्युएशन परीक्षा देणार, पदवी प्रमाणपत्र दगडी चाळीच्या भिंतीवर लागणार

मुंबई : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी लवकरच पदवीचं शिक्षण पूर्ण करणार आहे. अरुण गवळी सध्या नागपुर कारागृहातून शिक्षण घेत आहे. त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून बीए अभ्यासक्रमाची निवड केलीय. गवळी सध्या बीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे, असल्याची माहिती मिळतेय. अरुण गवळी सध्या मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी नागपूर कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे (Underworld Don Arun Gawali going to complete his graduation from jail).

अरुण गवळीने बीए अभ्यासक्रम उत्तीर्ण केल्यानंतर त्याचं पदवीचं प्रमाणपत्र दगडी चाळीच्या भिंतीवर लावलं जाणार असल्याची माहिती त्याच्या समर्थकांनी दिलीय. दगडी चाळीतील अरुण गवळीच्या निकटवर्तीयांनी पदवी अभ्यासक्रमाच्या माहितीला दुजोरा दिलाय.

काय आहे कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण?

शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांचा सदाशिव सुर्वे नावाच्या व्यक्तीशी संपत्तीवरुन वाद होता. त्यानंतर सदाशिव सुर्वेने अरुण गवळीच्या गँगमधील दोघांना जामसांडेकर यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा आरोप आहे. दोघांनी सदाशिवची अरुण गवळीशी भेट घालून दिली. गवळीने हत्या करण्यासाठी 30 लाखांची रक्कम मागितली.

सदाशिवने 30 लाखांची रक्कम देण्याची तयारी दर्शवली. अरुण गवळीने आपल्यावर संशय येऊ नये म्हणून प्रताप गोडसेला जामसंडेकरांच्या हत्येसाठी नवे शूटर शोधण्यास सांगितलं. गोडसेने नवे शूटर शोधण्याचे काम श्रीकृष्ण गुरव या साथीदाराकडे दिलं. श्रीकृष्णने नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी यांची निवड केली. तसेच त्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपये देण्याचे कबूल केले. यापैकी प्रत्येकी 20 हजार रुपयांचा अॅडव्हान्सही देण्यात आला होता.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, विजयकुमार गिरीने अशोक कुमार जयस्वार या सहकाऱ्यासह जवळजवळ 15 दिवस कमलाकर जामसंडेकरांवर लक्ष ठेवलं. त्यानंतर 2 मार्च 2007 रोजी जामसंडेकर यांच्या राहत्या घरी हत्या करण्यात आली. गवळीला या घटनेनंतर एका वर्षाने पकडण्यात आलं. तत्कालीन गुन्हे शाखेचे प्रमुख राकेश मारिया, अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस निरिक्षक दिनेश कदम, धनंजय दौंड, नीनाध सावंत, योगेश चव्हाण यांच्या पथकाने अरुण गवळीला अटक केली होती.

हेही वाचा :

Special Report: ‘भजन रुम’मध्ये टॉर्चर, सिलिंडर खालून भुयारी मार्ग; दगडी चाळ अंडरवर्ल्डचा अड्डा कशी बनली? वाचा सविस्तर

Dagdi Chawl | डॉन अरुण गवळीची ‘दगडी चाळ’ जमीनदोस्त होणार

गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचा ‘या’ अभिनेत्यासोबत साखरपुडा

व्हिडीओ पाहा :

Underworld Don Arun Gawali going to complete his graduation from jail

Published On - 11:45 pm, Sat, 17 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI