पत्नीचे इतरांशी संबंध, सासूने दोन नवऱ्यांना ठार मारलं, व्हिडीओत गंभीर दावे करत पतीची आत्महत्या

माझ्या पत्नीचे इतर तरुणांसोबत शारीरिक संबंध आहेत आणि ती माझा अपमान करण्यासाठी हे करते. माझ्या सासूनेही दोन विवाह केले आणि दोन्ही पतींना ठार मारले, असा आरोप तरुणाने आत्महत्येपूर्वी शूट केलेल्या व्हिडीओमध्ये केला आहे

पत्नीचे इतरांशी संबंध, सासूने दोन नवऱ्यांना ठार मारलं, व्हिडीओत गंभीर दावे करत पतीची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो

लखनौ : 25 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातून समोर आली आहे. गळफास घेण्यापूर्वी तरुणाने व्हिडीओ शूट करुन आपली पत्नी आणि सासूवर गंभीर आरोप केले आहेत. पत्नी आणि सासू आपल्याला कशाप्रकारे त्रास देत होत्या, ज्यामुळे आत्महत्या करण्यावाचून पर्याय उरलेला नाही, हे तरुणाने व्हिडीओमध्ये सांगितले. युवकाचा मृतदेह नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठेवून निदर्शने केली आणि त्याच्या आत्महत्येसाठी पत्नी आणि सासूला दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव ऋषभ पाठक आहे, त्याने 2020 मध्ये तनुसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर काही दिवसांनी तनू तिचे दागिने आणि कपडे घेऊन माहेरी आईकडे गेली. करवा चौथला तनुने महागड्या भेटवस्तूंची मागणी केल्याचा दावाही ऋषभने व्हिडीओमध्ये केला आहे. ऋषभने मौल्यवान वस्तू देण्यास असमर्थता व्यक्त केली, तेव्हा तनु आणि तिच्या आईने मारहाण करत गळ्यातील चेन आणि हातातील अंगठी हिसकावल्याचा आरोप त्याने व्हिडीओमध्ये केला आहे. ऋषभच्या मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंगही सापडले आहे.

व्हिडीओमध्ये ऋषभ काय म्हणाला?

ऋषभने गळफास घेण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवत पत्नी आणि सासूवर गंभीर आरोप केले. तो म्हणाला, ‘माझ्या पत्नीचे इतर तरुणांसोबत शारीरिक संबंध आहेत आणि ती माझा अपमान करण्यासाठी हे करते. माझ्या सासूनेही दोन विवाह केले आणि दोन्ही पतींना ठार मारले. सिगारेट आणि दारु पिऊन मायलेकी दोघीही पैशांसाठी माझ्यावर अत्याचार करतात, यामुळे माझ्या डोक्यावर 7 लाख रुपयांचे कर्ज झाले आहे. मी हा व्हिडीओ बनवत आहे जेणेकरून हे इतर कोणासोबतही होऊ नये.’

सध्या मृताच्या नातेवाईकांनी केलेल्या गदारोळानंतर पोलिसांनी अहवाल लिहून नातेवाईकांचा राग कमी केला. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन पोलिसांचे दिले आहे.

संबंधित बातम्या :

दारुसाठी पैसे न दिल्याचा राग, 70 वर्षीय वृद्धाला जीव घेतला, पुरावा मिटवण्यासाठी भयानक कृत्य

CCTV | एक्स बॉयफ्रेण्डचा तरुणीवर भररस्त्यात चाकू हल्ला, सीसीटीव्ही हादरवणारी दृश्यं कैद

दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडला, सांगाड्यावरील कपड्यांवरुन पती-मुलीने ओळखलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI