लग्न समारंभातून चिमुकलीला पळवलं, बलात्कार करुन हत्या, मृतदेह शेतात सापडला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Dec 03, 2021 | 4:28 PM

शेतात मुलीचा मृतदेह पडल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह झाडाझुडपात पडला होता. तिच्या शरीरावरील कपडेही फाटलेले होते. बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला

लग्न समारंभातून चिमुकलीला पळवलं, बलात्कार करुन हत्या, मृतदेह शेतात सापडला
प्रातिनिधीक फोटो

लखनौ : लग्न समारंभातून लहान मुलीचं अपहरण केल्यानंतर तिची बलात्कार करुन हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रामधील मलपुरा भागात ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. लग्नस्थळापासून अवघ्या 300 मीटर अंतरावर चिमुरडीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली होती.

बलात्कार पीडित चिमुरडीच्या शरीरावर एकही कपडा नव्हता. पोलिसांनी श्वान पथक आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावले. पोलिसांनी चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला. चिमुरडीच्या कुटुंबीयांनी आरोपीला पकडण्याची मागणी केली आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशातील मलपुरा भागात बुधवारी एक लग्न होते. वधूचा चुलत भाऊ आपल्या सहा वर्षांच्या मुलीसह लग्नाला आला होता. रात्री 11 वाजेपर्यंत आपली मुलगी डीजेवर डान्स करत होती. त्यानंतर ती अचानक तिथून गायब झाली, असं तिच्या वडिलांनी सांगितलं. शोधाशोध करुनही ती कुठेच सापडली नाही. सकाळपर्यंत ती बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस चौकीत तक्रार दिली.

मुलीचा मृतदेह झाडाझुडपात

शेतात मुलीचा मृतदेह पडल्याची माहिती गावकऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह झाडाझुडपात पडला होता. तिच्या शरीरावरील कपडेही फाटलेले होते. बलात्कार करुन तिची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला. लग्नाला उपस्थित नातेवाईकांची चौकशी पोलीस करत आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

संबंधित बातम्या :

डोंबिवलीतील सामूहिक बलात्कार प्रकरण, 33 जणांविरुद्ध 885 पानी आरोपपत्र

Love Attack एकीशी संबंध, दुसरीशी घरोबा, लग्नानंतर आले विघ्न

‘सहकुटुंब सहपरिवार’ फेम अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी, निर्मात्याच्या भावाला अटक

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI