डोळ्यात स्वप्न साठवलेली, पण भावी बायको मांत्रिकासोबत पळाली, युवकाच्या आयुष्यात असं का झालं?
या सुंदर चेहऱ्यामागच्या कारस्थानी डोक्याने त्या युवकाच फक्त मनच मोडलं नाही, तर आपण फसवलो गेलोय, हे समजल्यानंतर त्या युवकाला मोठा धक्का बसला. त्याने डोळ्यात सुखी संसाराची स्वप्न रंगवलेली.

लाल रंगाची लग्नाची वस्त्र परिधान करुन नटून-थटून ती कोर्ट मॅरेज करण्यासाठी आली. युवकाने सुद्धा त्याच्या डोळ्यात लग्नानंतर सुंदर आयुष्याची स्वप्न साठवली होती. आपल्यासोबत असं काही होईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नाही. पण या सुंदर चेहऱ्यामागच्या कारस्थानी डोक्याने त्या युवकाच फक्त मनच मोडलं नाही, तर आपण फसवलो गेलोय, हे समजल्यानंतर त्या युवकाला मोठा धक्का बसला. या नवरीने युवकाला फसवून लाखो रुपयांचे दागिने आणि कॅश घेऊन पसार झाली. उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये लुटारु दुल्हनच हे प्रकरण समोर आलय. मांत्रिक बाबासोबत मिळून तिने युवकाला लग्नाच्या नावाखील फसवलं.
अखेर पीडित युवकाने पोलिसात तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलीस आता ही लुटारू नवरी आणि तिच्या टोळीचा शोध घेत आहेत. हरदोईच्या सांडी गावातील हे प्रकरण आहे. पीडित नीरज गुप्ताने पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं की, बऱ्याच प्रयत्नानंतरही त्याच लग्न जमत नव्हतं. या दरम्यान त्याची एका मांत्रिकाबरोबर भेट झाली. त्याने लग्न जुळवून देण्याच आश्वासन दिलं.
साडेतीन लाख रुपयांचे दागिने बनवले
काही दिवसांनी मांत्रिकाने नीरजला एका सुंदर मुलीचा फोटो दाखवला. तो लग्नासाठी तयार झाल्यानंतर मांत्रिकाने त्याला लग्नाची तयारी करायला सांगितली. त्यानंतर युवकाने त्याने मेहनतीने कमावलेल्या पैशातून साडेतीन लाख रुपयांचे दागिने बनवले. हे सर्व दागिने घेऊन तो कुटुंबासोबत कोर्ट मॅरेज करण्यासाठी आला. तिथे तांत्रिक आणि ती मुलगी नववधूनच्या पोषाखात पोहोचली. संधी पाहून तिने दागिने आणि कॅश बॅगेत टाकून दोघे फरार झाले.
ती परत आलीच नाही
पीड़ित नीरज गुप्ताने सांगितलं की, त्याने मुलीला पाहिल्यानंतरच तो तिच्याशी लग्न करण्याची स्वप्न पाहू लागला. या दरम्यान मांत्रिकाने मुलीला अंगावर दागिने घालायला सांगितले. ती लगेच तयार झाली. दागिने घेऊन मुलगी तयार होण्यासाठी गेली, ती परत आलीच नाही. हरदोई क्षेत्राधिकारी अंकित मिश्रा यांनी सांगितलं की, “कोर्ट मॅरेजच्या नावाखाली फसवणुकीच हे प्रकरण समोर आलय. पीडित युवकाच्या तक्रारीवरुन आरोपी मांत्रिक आणि लुटारु नवरीचा शोध सुरु आहे”
