नवऱ्याला असं आवडतं म्हणून मी…, पोलिसांनी तिघांना नको त्या अवस्थेत पकडलं, बायकोची धक्कादायक कबुली
24 फेब्रुवारीच्या रात्रीची कानपूरच्या गोविंदनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. अल्पवयीन मलीचे वडिल शिक्षक आहेत. त्यांनी त्यांचं घर आरोपी जोडप्याला भाड्यावर दिलं होतं.

भाड्याच्या घरात राहणारी एका महिला घर मालकाच्या मुलीला फूस लावून आपल्यासोबत पळवून घेऊन गेली. नंतर पळवून नेलेल्या मुलीच आपल्याच नवऱ्यासोबत लग्न लावलं. घर मालकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना फरीदाबाद येथून अटक केली. पोलीस त्या ठिकाणी पोहोचले, त्यावेळी तिघे एकाच खोलीत आक्षेपार्ह स्थितीमध्ये होते. पोलिसांनी आरोपी जोडप्याला अटक करुन जेलमध्ये पाठवलय. मुलीला न्याय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं. तिथे तिची जबानी नोंदवून घेतल्यानंतर तिला कुटुंबियांकडे सोपवलं. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील ही घटना आहे.
24 फेब्रुवारीच्या रात्रीची कानपूरच्या गोविंदनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. अल्पवयीन मलीचे वडिल शिक्षक आहेत. त्यांनी त्यांचं घर आरोपी जोडप्याला भाड्यावर दिलं होतं. या जोडप्याने नव्या घरात शिफ्ट होताच घर मालकाच्या मुलीला फूस लावल्याचा आरोप आहे. आधी ते मुलीला घरी बोलावयाचे व बराचवेळ तिच्यासोबत गप्पा मारायचे. मुलीच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दिली. त्यावेळी ते म्हणाले की, सुरुवातीला मी याकडे दुर्लक्ष केलं. पण नंतर मला संशय आला, त्यावेळी मी मुलीला त्यांच्या खोलीत जाण्यास मनाई केली.
पोलिसांनी कसा शोध लावला?
त्यानंतर आरोपींनी मुलीला फूस लावली व तिला आपल्यासोबत घेऊन पळून गेले. मुलीने घरातून पळताना रोख रक्कम आणि दागिने घेऊन सुद्धा पसार झाली होती. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांनी मुलीचा भरपूर शोध घेतला. पण काही सुगावा लागला नाही, त्यावेळी पोलिसात तक्रार दिली. यूपी पोलिसांनी तात्काळ इलेक्ट्रॉनिक सर्विलांसद्वारे आरोपी जोडप्याचा पाठलाग करत त्यांना फरीदाबादच्या एका खोलीतून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पोलीस लोकेशनवर पोहोचले, तेव्हा आरोपी जोडपं आणि अल्पवयीन मुलगी एकाच खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत होते.
डोक्यात सिंदूर होता
पोलिसांनी आरोपी महिलेची चौकशी केली, त्यावेळी तिने सांगितलं की, मागच्यावर्षी तिने प्रेमविवाह केला होता. त्यावेळी ती अल्पवयीन होती. नवऱ्याला अल्पवयीन मुली आवडतात म्हणून तिने घर मालकाच्या अल्पवयीन मुलीला त्याच्यासोबत लग्नासाठी तयार केलं. मुलीने पोलिसांना सांगितलं की, दीदी म्हणजे आरोपी महिलेने तिला घरातून पळण्यासाठी तयार केलं होतं. तिच्या सांगण्यावरुन घरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन ती पळाली. त्यानंतर एका मंदिरात लग्न केलं. पोलीस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी तिच्या डोक्यात सिंदूर होता.
