मूल नसल्यावरुन डॉक्टर वहिनीचे सततचे टोमणे, दीराकडून हातोडी-कात्रीने वार करत हत्या

आपल्याला मूल होत नव्हतं, म्हणून डॉक्टर वहिनी सातत्याने टोमणे मारायची. चारचौघात त्यावरुन पाणउतारा करायची. त्यामुळे वहिनीविषयी मनात राग साठला होता, असा दावा आरोपीने केला आहे.

मूल नसल्यावरुन डॉक्टर वहिनीचे सततचे टोमणे, दीराकडून हातोडी-कात्रीने वार करत हत्या
मयत डॉ. सपना गुप्ता
Follow us
| Updated on: Jul 22, 2021 | 10:36 AM

लखनौ : डॉक्टर वहिनीचे सततचे टोमणे ऐकून बेजार झालेल्या दीराने तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हातोडी आणि कात्रीने वार करत दीराने डॉक्टर विवाहितेला तिच्या क्लिनिकमध्ये जाऊनच संपवलं. उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डॉ. सपना गुप्ता-दत्ता यांच्या हत्येनंतर आरोपी दीर अनिल दत्ताने पोलिसात आत्मसमर्पण केलं.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या महमूरगंज भागात ही घटना घडली. रघुवर कॉलनीत असलेल्या डॉक्टर वहिनीच्या क्लिनिकमध्ये जाऊनच दीराने तिचा जीव घेतला. आपल्याला मूल होत नव्हतं, म्हणून डॉक्टर वहिनी सातत्याने टोमणे मारायची. चारचौघात त्यावरुन पाणउतारा करायची. त्यामुळे वहिनीविषयी मनात राग साठला होता, असा दावा आरोपीने केला आहे.

हातोडी आणि कात्रीने डोक्यात वार

वहिनीचं क्लिनिक बंगल्याच्या तळ मजल्यावर होतं, तर आरोपीचे आई-वडील तिथेच वरच्या मजल्यावर राहतात. त्यांना भेटण्याच्या निमित्ताने आल्यावर वहिनी टोमणे मारायची. बुधवारीही तिने आपल्यासोबत आपल्या भावाविषयी आक्षेपार्ह उद्गार काढले. त्यामुळे हातोडी आणि कात्रीने डोक्यात वार करुन आपण तिची हत्या केली, अशी कबुली आरोपीने दिली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज पाहून तपासाला सुरुवात केली आहे. हत्येसाठी वापरलेला हातोडा आणि कात्रीही पोलिसांनी जप्त केली आहे.

वहिनी-दीरामध्ये कौटुंबिक वाद

डॉ. सपना गुप्ता-दत्ता ही वाराणसीत दत्ता डायग्नॉस्टिक सेंटर चालवत होती. तिचे पतीही डॉक्टर असून त्यांना दोन मुली आहेत. सासरेही डॉक्टर असून त्यांच्या नावे बँकेत मोठी रक्कम जमा असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुनच वहिनी-दीरामध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरु असल्याचं बोललं जातं.

संबंधित बातम्या :

दिरासोबत राहण्यासाठी आधी पतीची हत्या, आता वहिनीने त्याच दिराचाही जीव घेतला

वहिनीला ‘मधलं बोट’ दाखवलं, दीराला तीन वर्षांचा कारावास

(Uttar Pradesh Murder Doctor Sister in law Sapna Gupta killed by brother in law for taunts)

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.