Unnao Girls Death | उन्नावमध्ये शेतात तीन अल्पवयीन मुली ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळले, दोघींचा मृत्यू

तीन अल्पवयीन मुली दुपारी जनावरांसाठी चारा घेण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत जेव्हा त्या घरी परतल्या नाहीत तेव्हा त्यांचा शोध घेण्यात आला.

Unnao Girls Death | उन्नावमध्ये शेतात तीन अल्पवयीन मुली ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळले, दोघींचा मृत्यू
unnao Three Girls Found Tied
Follow us
| Updated on: Feb 18, 2021 | 10:46 AM

लखनऊ : उत्तर प्रदेशच्या उन्नाव (Unnao) येथे शेतात चारा घ्यायला गेलेल्या तीन अल्पवयीन मुली (Unnao Three Minor Girls Found Tied) संशयित परिस्थितीत गव्हाच्या शेतात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यापैकी दोन मुलींचा मृत्यू झाला आहे तर तिसऱ्या मुलीची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. ही घटना उन्नावच्या बबुरहा गावातील आहे. सूचना मिळाल्यावर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलींना तात्काळ असोहा सीएचसी येथे घेऊन गेले. मात्र, तिथे डॉक्टरांनी दोन मुलींना मृत घोषित केलं. प्राथमिक माहितीनुसार, तीन मुली जनावरांसाठी चारा घेण्यासाठी निघाल्या होत्या (Unnao Three Minor Girls Found Tied).

हिंदुस्तानच्या माहितीनुसार, तीन अल्पवयीन मुली दुपारी जनावरांसाठी चारा घेण्यासाठी शेतात गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत जेव्हा त्या घरी परतल्या नाहीत तेव्हा त्यांचा शोध घेण्यात आला. सूरजपाल हे शेतात पोहोचले तेव्हा या तिघी बेशुद्ध पडल्या होत्या. एकाच ओढणीत तिघींचेही हात बांधलेले होते. घटनेचा तपास अधिकारी एडीजी एसएन रावतही रात्री उशिरा गावात पोहोचले.

‘विष प्राषण केल्याने मृत्यू’

या प्रकरणी उन्नावच्या एसपीने सांगितलं की, जेव्हा मुली बऱ्याच वेळापर्यंत घरी परतल्या नाहीत तेव्हा त्यांचा शोध सुरुव करण्यात आला. यावेळी मुली शेतात सापडल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं जिथे डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. कुटुंबीयांच्या मते, “घटना स्थळावरुन मोठ्या प्रमाणात फेस आढळून आला. डॉक्टरांनी प्रथम दृष्ट्या विष प्राषण केल्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं. घटनास्थळावर उपस्थित इतर लोकांच्या सांगण्यानुसार पोलीस तपास करत आहेत.”

हॉरर किलिंगच्या अँगलने तपास

पोलिसांना या दरम्यान अनेक महत्त्वाची माहिती मिळायला हवी. पोलीस आता या प्रकरणी हॉरर किलिंगच्या अँगलनेही तपास करत आहेत. पोलीस प्रत्येक अँगलने या प्रकरणाचा तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेपूर्वी मुलींसोबत दोन मुलांना बघितलं गेलं होतं. तसेच, पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. त्याची चौकशी सुरु आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण गावाचं रुपांतर छावणीत झालं आहे (Unnao Three Minor Girls Found Tied).

मुलीला दिल्ली एअरलिफ्ट करण्याची मागणी

तिसरी मुलगी जिची प्रकृती गंभीर आहे तिला कानपूरच्या रिजेन्सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. भीम आर्मी ते काँग्रेसपर्यंत सर्वांनी या मुलीला दिल्ली एअरलिफ्ट करण्याची मागणी केली आहे.

Unnao Three Minor Girls Found Tied

संबंधित बातम्या :

हिंगणघाट जळीतकांड सुनावणी : आरोपीने प्राध्यापिकेला घटनेच्या दोन महिन्यापूर्वीही रस्त्यात होतं अडवलं

पूजा राठोडचा गर्भपात ते पूजा चव्हाणची आत्महत्या, यवतमाळ ते पुणे 45 तासांचा घटनाक्रम

VIDEO| धक्कादायक! चार तृतीयपंथीयांची वाहतूक पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.