AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagavane Death case : तरच आमच्या गेलेल्या लेकीला न्याय मिळेल.. वैष्णवीच्या पालकांची मागणी काय ?

वैष्णवी हगवणेचा तिचा पती, नणंद, सासू, सासरे यांनी अतोनात छळ केला. तिच्या मृत्यूनंतर तरी तिला न्याय मिळावा. तिच्या सासरच्यांवर मकोकाअंतर्गत कारवाई करून कठोर शिक्षा करा अशी मागणी वैष्णवीच्या आई-वडिलांनी केली आहे.

Vaishnavi Hagavane Death case : तरच आमच्या गेलेल्या लेकीला न्याय मिळेल.. वैष्णवीच्या पालकांची मागणी काय ?
वैष्णवीला न्याय द्या, कस्पटे कुटुंबाची मागणीImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: May 23, 2025 | 8:54 AM
Share

लग्नात 51 तोळं सोनं, चांदीची भांडी, फॉर्च्युनर कार देउऊनही समाधान झालेल्या, सुनेचा हु्ंड्यासाठी छळ करणाऱ्या पुण्यातील मुळशी येथील हगवणे कुटुंबाच्या क्रूर कृत्यांची माहिती आत्तापर्यंत सर्वत्र पोहोचली आहे. मोठ्या सुनेला छळलंच पण लहान सुनेलाही इतका त्रास दिला की तिने अखेर आपल्या 9 महिन्यांच्या मुलाचाही न विचार करता टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं. गेल्या आठवड्यात वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली आणि तेव्हापासून हे प्रकरण सगळीकडे गाजू लागलं. राज्यात सध्या संतापाचं वातावरण असून तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यातील तर अश्रू सुकून गेले आहेत. वैष्वणीचा अतोनात छळ करून तिला मरणाच्या दारात ढकलणाऱा तिचा नवरा, नणंद आणि सासू यांना तेव्हाच अटक झाली पण सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे सात दिवस फरार होते.

अखेर आज पहाटे पिंपरी पोलिसांनी त्यांना स्वारगेट येथून अटक केली. त्यांना आता लवकरच कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. वैष्णवीच्या सासरे-दीरांना अटक झाल्याची बातमी समजल्यानंतर तिचे आई-वडील, कस्पटे कुटुंब अतिशय भावूक झालं पण त्यांनी या कारवाईबद्दल पोलिसांचे, प्रशासनाचे आणि हा विषय उचलून धरणाऱ्या माध्यमांचेही आभार मानले. वैष्णवीच्या सासरच्या लोकांवर मकोका लावून त्यांना कठोरात शिक्षा व्हावी अशी मागणी कस्पटे कुटुंबाने केली असून तरच आपल्या गेलेल्या मुलीला न्याय मिळेल अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.

हगवणे कुटुंबावर मकोका लावा

वैष्णवीचा अतोनात छळ करून तिला जीव देण्यास भाग पाडणाऱ्या हगवणे कुटुबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी तिचे आई-वडील यांनी केली आहे. पती, नणंद, सासू,, घरातील लोकांनी वैष्णवीला खूप त्रास दिला. हगवणे कुटुंबियांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी कस्पटे कुटुंबीयांची मागणी आहे.

तसेच त्यांनी अजित पवारांचे आणि सर्व माध्यमांचे आभार मानले, त्यांच्यामुळे  सासरे आणि दीर  यांना अटक झाली, माझ्या मुलीला न्याय मिळतोय, असे वैष्णवीचे वडील म्हणाले.

वैष्णवीचे सासरे, दीर यांना अशा ठोकल्या बेड्या

  1. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिचे सासरे-दीर सात दिवसांपासून फरार होते. अखेर काल रात्री उशीरा पिंपरी पोलिसांच्या पथकाकडून राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे यांच्या अटकेची कारवाई करण्यात आली.
  2.  राजेंद्र हगवणे हे एका हॉटेलमध्ये जेवत असल्याचा CCTV पोलिसांच्या हाती लागला.
  3. त्याच CCTV  फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ट्रॅक केल्याची माहिती.
  4. मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वारगेट परिसरातून राजेंद्र, सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी केली अटक
  5. अटकेनंतर दोन्ही आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात आणलं.
  6. दोन्हीआरोपींना घेऊन पोलीस आता बावधन पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.