Video : महावितरणच्या अधिकाऱ्याला ग्राहकाकडून मारहाण, चाळीसगावमधील घटना, व्हिडीओ व्हायरल

Video : महावितरणच्या अधिकाऱ्याला ग्राहकाकडून मारहाण, चाळीसगावमधील घटना, व्हिडीओ व्हायरल
महावितरणच्या अधिकाऱ्याला ग्राहकाकडून मारहाण
Image Credit source: social

चाळीसगावमधील महावितरणचे कक्ष दोनचे सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांना शहरातील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या धनराज अशोक पाटील या ग्राहकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडीलय. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शुभम कुलकर्णी

Mar 26, 2022 | 8:50 AM

चाळीसगाव :  मारहाणीचा आणि शिवीगाळ केल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायर होतोय. यामध्ये एक व्यक्ती महावितरणच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याचं दिसून येतंय. यापूर्वी देखील अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी वेळीवेळी शासकीय कर्मचाऱ्यांकडून समोर येते. याही वेळी शासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. चाळीसगावमधील महावितरणचे कक्ष दोनचे सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांना शहरातील इंदिरा नगरमध्ये राहणाऱ्या धनराज अशोक पाटील या ग्राहकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, अशा प्रकारे अधिकाऱ्याला मारहाण केल्याने अनेकांनी यावर तिखट प्रतिक्रिया दिलीय तर काहींनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ

नेमकं प्रकरण काय?

वीजबिल थकीत असल्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा कायमस्वरुपी खंडीत करण्यात आला होता. धराज पाटील याने थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांची भेट घेतली. यावेळी वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. मात्र, उकलकर यांनी त्याला कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितलं. हे ऐकून धनराज पाटील याने सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे.या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांनी दिलेल्या फिर्याफिवरून धनराज पाटील याच्याविराधात गुन्हा दाखल करण्यात आला असून धराज पाटीलला अटक करण्यात आलीय.

कागदपत्रे मागवल्याने संताप

धराज पाटील याने थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांची भेट घेतली. यावेळी वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी केली. मात्र, उकलकर यांनी त्याला कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितलं. हे ऐकून धनराज पाटील याने सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांना शिवीगाळ करत मारहाण केली आहे.या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

घटनेनंतर तात्काळ कारवाई

यापूर्वी देखील अधिकाऱ्यांना मारहाण केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यावर कठोर कारवाई व्हायला हवी अशी मागणी वेळीवेळी शासकीय कर्मचाऱ्यांकडून समोर येते. याही वेळी शासकीय अधिकाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. मात्र, यावेळी मारहाणीच्या प्रकरणात तात्काळ कारवाई झाल्याचं दिसून आलं. चाळीसगावमधील महावितरणचे कक्ष दोनचे सहाय्यक अभियंता भरत उकलकर यांना धनराज अशोक पाटील याने मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल होताच त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आलीय.

इतर बातम्या

Video : ‘अरे भई निकल के आ घर से, आ घर से…’ का Viral होतंय हे गाणं? हर्ष गोयंकांनीही केलंय Tweet

कोरोनापेक्षा सध्याचे राजकारण भयंकर! इतक्या वर्षात असे राजकारण पाहिले नाही, जेष्ठ साहित्यीक Madhu Mangesh Karnik यांनी व्यक्त केली नाराजी

Oily skin issue: तेलकट त्वचेची समस्या आहे? मग ‘हे’ उपाय करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें