आता तू घरी येऊ नको… अकोल्यात ‘पती, पत्नी और वो…’ ‘वो’च्या नादाला लागलेल्या नवऱ्याची पोलिसांसमोरच धुलाई…!
'पती-पत्नी और वो' हा चित्रपट अनेकांना माहीत असेल. पती पत्नीच्या नात्यात 'वो'येताच जी तारांबळ उडते ती त्यात दाखवण्यात आली होती. मात्र 'पती-पत्नी और वो'चा सीक्वेल खऱ्या आयुष्यात, प्रत्यक्षात आला आणि अभूतपूर्व गोंधळ माजला.

अभिनेते संजीव कुमार यांचा ‘पती-पत्नी और वो’ हा चित्रपट अनेकांना माहीत असेल. पती पत्नीच्या नात्यात ‘वो’येताच जी तारांबळ उडते ती त्यात दाखवण्यात आली होती. मात्र ‘पती-पत्नी और वो’चा सीक्वेल खऱ्या आयुष्यात, प्रत्यक्षात आला आणि अभूतपूर्व गोंधळ माजला. अकोल्यात या चित्रपटाचा ‘सिक्वेल’ प्रत्यक्षात बघायला मिळाला. मात्र, या सिक्वेलमध्ये ‘वो’च्या नादाला लागलेल्या पतीची पत्नीने चांगली धुलाई केल्याचं सर्वांना याची देही याची डोळा पहायला मिळालं. याच घटनेची सध्या संपूर्ण शहरात चांगलीच चर्चा सुरू आहे.
नेमकं घडली तरी काय ?
अनेक दशकांपूर्वी येऊन गेलेला ‘पती-पत्नी और वो’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. मात्र, आजच्या 2025 च्या युगातही त्याचीच पुनरावृत्ती झाली. अकोल्यात या चित्रपटाचा ‘सिक्वेल’ प्रत्यक्षात सर्वांना बघायला मिळाला. मिळालेल्या माहितीनुसार, 9 महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातल्या बार्शीटाकळी तालुक्यातील विझोरा गावातल्या सुरज तायडेचा प्रेमविवाह झाला. लग्नानंतर त्याने कोमला हिला आयुष्यभर साथ देण्याचं वचनही दिलं होत. मात्र, अमरावतीला परीक्षा देण्यासाठी गेलेल्या पत्नीच्या, कोमलच्या माघारी त्याने दुसऱ्याच महिलेशी लग्न केलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याने जिच्याशी दुसरं लग्न केली ती दुसरी तिसरी कोणी नव्हे तर त्याच्याच बायकोची मामेबहीण, श्रेया निघाली.
दुसरं लग्न करून पहिल्या बायकोला केला व्हिडीओ कॉल
मात्र लग्न करून तो नवरा तेवढ्यावरच थांबला नाही तर दुसरं लग्न केल्यानंतर त्याने त्याच्या पहिल्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला. आपण दुसरं लग्न केल्याचं त्याने तिला थेट सांगितलं आणि आता तू घरी येऊ नकोस, असाही सल्ला मानभावीपणे त्याने तिला दिला. मात्र हे ऐकतचा त्याची पत्नी संतापली आणि तिने अकोल्यात येत थेट सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन गाठल. तेथे तिने तक्रार तर दाखल केलीच पण दुसरं लग्न करून नव्या बायकोसह आलेल्या पतीची त्या महिलेने थेट पोलीस ठाण्यातच बेदम धुलाई केली. यामुळे मोठा गदारोळ माजला. पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ उडाला. हे प्रकरण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. यावेळी तेथे उपस्थित असलेल्यांना पती – पत्नी और ओ चित्रपटाची आठवण झाली .
