बॉयफ्रेंडला पाठवले न्यूड फोटो, नंतर केला व्हिडीओ कॉल; पतीला कळाल्यानंतर… पोलिसही हादरले
एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका महिलेल्या गोड बोलून एका व्यक्तीने जाळ्यात अडकवले होते. जेव्हा हे प्रकरण तिच्या पतीला कळाले तेव्हा त्याला धक्का बसला. पण नंतर त्याने जे पाऊल उचलले ते पाहून पोलिसही हादरले.

एकटेपणामुळे कधीकधी आपण अशा गोष्टी करतो, ज्यातून बाहेर पडण्यासाठी लोक चुकीची पावलं उचलतात. असाच काहीसा प्रकार स्कॉटलंडमधील जेडबर्ग येथे राहणाऱ्या 44 वर्षीय गेल एस्टिन यांच्यासोबत घडला. एकटेपणा दूर करण्यासाठी त्यांनी एक पाऊल उचललं, जे त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरलं. चला, जाणून घेऊया ही संपूर्ण घटना.
2019 पासून सुरू झालेली कहाणी
गेल यांचं लग्न झालं होतं आणि त्यांना दोन मुलंही होती. पण वैवाहिक जीवनात त्यांना एकटेपणा जाणवत होता. त्यांचे पती सायमन यांच्याशी नातं फारसं खास वाटत नव्हतं. हा रिकामेपणा भरून काढण्यासाठी गेल यांनी इंटरनेटच्या दुनियेत पाऊल ठेवलं. तिथे त्यांची ओळख डेव्हिड विल्यम्स नावाच्या व्यक्तीशी झाली, ज्याने स्वतःला नायजेरियात काम करणारा अमेरिकन मरीन इंजिनीअर असल्याचं सांगितलं. डेव्हिडच्या गोड बोलण्यात एक वेगळीच जादू होती. तो गेल यांच्याशी तासन्तास गप्पा मारायचा, त्यांचं कौतुक करायचा आणि त्यांना खास असल्याची जाणीव करुन द्यायचा. गेल यांना वाटू लागलं की, कदाचित त्यांना तो जोडीदार मिळाला, जो त्यांच्या आयुष्यात आनंद आणू शकेल.
गोड बोलण्यात फसवून ब्लॅकमेल
डेव्हिडच्या गोड बोलण्यात फसून गेल यांनी त्याला केवळ पैसे पाठवले नाहीत, तर आपले न्यूड फोटोही पाठवले, जी त्यांची सर्वात मोठी चूक ठरली. काही काळानंतर डेव्हिडचा खरा चेहरा समोर आला. त्याने गेल यांना ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि धमकी दिली की, जर त्यांनी आणखी पैसे पाठवले नाहीत, तर तो त्यांचे फोटो सोशल मीडियावर लीक करेल. यामुळे गेल घाबरल्या.
डेव्हिडचं फसवं प्रोफाइल
शेवटी, गेल यांनी धैर्य एकवटलं आणि पोलिसांकडे जाऊन सर्व काही सांगितलं. त्यांनी पती सायमन यांनाही सारी हकिकत सांगितली. सायमनला गेल यांचं बोलणं ऐकून राग तर आला, पण त्यांनी गेल यांना सोडण्याऐवजी स्वतःला दोषी ठरवलं. त्यांना वाटलं की, जर त्यांनी गेल यांना जास्त वेळ आणि प्रेम दिलं असतं, तर कदाचित हे सर्व घडलं नसतं. या कठीण प्रसंगात सायमनने गेल यांची साथ दिली. दोघांनी मिळून या संकटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नंतर कळलं की, डेव्हिड विल्यम्सचं प्रोफाइल पूर्णपणे खोटं होतं. ठगाने 51 वर्षीय पोर्तुगीज व्यावसायिक पेड्रो हिपोलिटो यांच्या फोटोंचा वापर केला होता. जेव्हा पेड्रो यांना याबाबत कळलं, तेव्हा ते संतापले आणि त्यांनी अनेक खोटी अकाउंट्स बंद केली.
46 व्या वर्षी गेल यांचं निधन
दोघांना वाटलं की आता सर्व काही ठीक होईल, पण जुलै 2020 मध्ये गेल यांच्या आयुष्यात आणखी एक मोठा धक्का बसला. डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांना ब्रेन ट्यूमर आहे, जो इतक्या धोकादायक जागी होता की शस्त्रक्रिया शक्य नव्हती. डॉक्टरांनी केमोथेरपी आणि रेडिओथेरपीचा सल्ला दिला, पण गेल यांच्याकडे जास्तीत जास्त एक वर्षाचा काळ होता. गेल यांनी हार मानली नाही आणि आपलं उरलेलं आयुष्य अविस्मरणीय करण्यासाठी बकेट लिस्ट बनवली. पण वेळेने त्यांची साथ दिली नाही. ऑगस्ट 2020 मध्ये, वयाच्या 46 व्या वर्षी, गेल यांनी या जगाचा निरोप घेतला.
