ठाण्यात उच्चभ्रू वस्तीत राहायची, पण निघाली चोर, महागडा लॅपटॉप चोरताना महिलेचं फुटलं बिंग

ठाण्यातील घोडबंदर रोड येथील विजय सेल्स या दुकानात दिवाळीनिमित्त खरेदीकरीता झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या चोरीमध्ये किमती लॅपटॉप चोरी करण्यात आला असून या प्रकरणी एका महिलेला कापुरबावडी पोलीसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ठाण्यात उच्चभ्रू वस्तीत राहायची, पण निघाली चोर, महागडा लॅपटॉप चोरताना महिलेचं फुटलं बिंग
arrest


ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोड येथील विजय सेल्स या दुकानात दिवाळीनिमित्त खरेदीकरीता झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला. या चोरीमध्ये किमती लॅपटॉप चोरी करण्यात आला असून या प्रकरणी एका महिलेला कापुरबावडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

एक लाखाचा लॅपटॉप चोरला

मिळालेल्या माहितीनुसार 3 नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास विजय सेल्स या दुकानात दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर असलेल्या विविध ऑफर्समुळे खरेदीकरीता मोठी गर्दी झाली होती. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन एक अनोळखी महिला इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आली. करून गर्दीचा फायदा घेत या महिलेने 99,999 रूपये किमतीचा एक एसर कंपनीचा लॅपटॉप चोरी केला होता. त्यावरून विजय सेल्सने तक्रार दिली होती. दाखल तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

महिला उच्चभ्रू वस्तीत राहणारी, तपास करणे कठीण

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. चोरी करणारी महिला तिने परिधान केलेल्या पकड्यांवरून तसेच तिच्या बोलण्यावरून सुशिक्षित आणि उच्चभ्रू वस्तीत राहणारी असावी असं वाटत होतं. त्यामुळे तिची माहिती कठीण होऊन बसलं होतं. दरम्यान, पोलिसांनी मोबाईल कंपनीशी संपर्क साधून प्राप्त मोबाईल क्रमांकाचं तांत्रिक विश्लेषण केलं. तसेच चोरी करणाऱ्या महिलेचा मोबाईल क्रमांक शोधला. या संशयित मोबाईल क्रमांकाच्या कंपनीशी संपर्क साधून त्याबाबतची सर्व माहिती प्राप्त केली.

सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून केला तपास

घटनास्थळाहून चोरी करणाऱ्या महिलेचं प्राप्त सीसीटीव्ही फुटेज, तसेच गुन्ह्याच्या अनुषंगाने इतर 11 ठिकाणाच्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. त्यानंतर सापळा रचून या महिलेला ताब्यात घेण्यात आलं. या व्हिडिओमध्ये सदरची महिला लॅपटॉप चोरल्यानंतर कॅश काउंटरला जाताना दिसते. तसेच लॅपटॉपचे लॉक खोलून तो एका फ्रिजमध्ये ठेवते. नंतर तो बॅगेत घालून पळ काढते. यासारख्या आणखी दहा ते बारा दुकानातून सदर महिलेने चोरी केल्याची कबुली दिली आहे.

महिलेकडून तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

दरम्यान, आरोपी महिलेकडून गुन्ह्यातील चोरी केलेला एका लाख रुपये किमतीचा अॅसर कंपनीचा लॅपटॉप, तसेच मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क, कॅमेरा, ब्ल्यू टूथ डिव्हाईस, कपडे, राउटर, हेडफोन्स, घड्याळ, पोर्टेबल प्रिंटर, डिव्हीडी प्लेअर, व्हॅक्यूम क्लिनर असा एकूण 2,65,033 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या :

Chhorii Trailer Release | ‘लपाछपी’चा हिंदी रिमेक, नुसरत भरुचा अभिनित भयपट ‘छोरी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

औरंगाबादः वैजापूरात काका पुतण्यातील बेबनाव चव्हाट्यावर, अभय पाटील चिकटगावकर भाजपच्या गोटात जाणार

Acid Attack | विवाहित महिलेला लग्नाची मागणी, वारंवार नकार दिल्याने हात बांधून अंगावर अ‍ॅसिड ओतलं, राजधानीतील धक्कादायक घटना

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI