Yavatmal Accident : यवतमाळच्या घुग्घुस वणी रोडवर ट्रकने 5 मजुरांना चिरडले, 2 जण जागीच ठार

यवतमाळच्या घुगूस वणी मार्गावर भरधाव ट्रकने 5 मजुरांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भीषण अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Yavatmal Accident : यवतमाळच्या घुग्घुस वणी रोडवर ट्रकने 5 मजुरांना चिरडले, 2 जण जागीच ठार
यवतमाळच्या घुग्घुस वणी रोडवर ट्रकने 5 मजुरांना चिरडलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 04, 2022 | 8:55 PM

यवतमाळ : यवतमाळच्या घुग्घुस वणी मार्गावर भरधाव ट्रकने (Truck Accident) 5 मजुरांना (Worker Death) चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भीषण अपघातात दोन जण ठार तर तीन जण गंभीर ( Injured) जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. Ivrcl कंपनीचे डागडुजीच काम या रोडवर सुरू आहे, पुनवट गावाजवळ भरधाव ट्रकने 5 जणांना चिरडल्याचा हा प्रकार समोर आल्याने आता या परिसरात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसात रस्ते अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. रस्त्यावरील भरधाव वेग अनेकदा वाहचालकांना तसेच इतरांना नडतो आहे. वेगाच्या नादात अनेक भलतेच प्रकार घडत आहे. आणि अनेकांच्या जीवावर बेतत आहे. यावेळी रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या जीवावर हा प्रसंग ओढावला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळला आहे. असे प्रकार थांबवण्यासाठी वेगावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

घुग्घुस -वणी राज्य महामार्ग क्रमांक सात वरील प्रकार

पुनवट गावाजवळ चार वाजताचा सुमारास भिषण अपघात घडला. घुग्घूसपासून अवघ्या पाच कि.मी.अंतररावर घडलेल्या अपघातात भरधाव येणाऱ्या ट्रकने IVRCL कंपनीचा पाच मजूरांना चिरडले. महादेव बालवटकर ( बेलोरा ), राजू मिलमिले ( मारेगाव ) असे मृतकांची नावे आहेत. सूरेश जूनघरी, सतीश गेडाम आणि परत एक मजूर गंभीररीत्या जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. ही घटना आज चार वाजताचा दरम्यान घडली. या वाढलेल्या अपघाताच्या घटना आता चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. हे अपघात रोखण्याचं आणि रोडवर सुरक्षेचं वातावरण तयार करण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर असणार आहे.

अपघाताच्या घटना वाढल्या

प्राप्त माहीतीनुसार , घुग्घुस – वणी मार्गावर आयव्हीआरसीएल ( IVRCL) या कंपनीचे मार्गाचा डागडुजीचे काम सूरू होते.घुग्घुस-वणी राज्य महामार्ग क्रमांक सात वरील पुनवट गावा जवळ कंपनीचे मजूर डागडुजी कार्यात व्यस्त होते.ट्रक्टर आणि पिकअपने माल वाहतूक करीत होते.अश्यात वणी येथून येणाऱ्या भरधाव ट्रकने ( MH 31 FC6399 ) पाच मजूरांना चिरडले.यात बेलोरा आणि मारेगाव येथिल मजूराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.तर तीन मजूर गंभीररीत्या जखमी झाले. अपघाताची माहीती मिळताच वणी तालुक्यातील सिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गजानन तरवडे यांनी घटनास्थळ गाठले. जखमीना उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. मागील काही महिण्यात या मार्गावर लहान-मोठ्या अपघाताचा अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेकांचे बळीही गेल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.