बाप तो बाप रहेगा… इन्स्टा पोस्ट डोक्यात गेली अन् थेट तरुणाला भोसकलं, काय घडलं?; हत्याकांडाने वर्ध्यात खळबळ
सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो, लहान-मोठे कोणीही असो, मोबाईल तर वापरतातच. त्यातच सोशल मीडियाचा वापरही खूप वाढलाय, फेसबूक, इन्स्टाग्रामवर स्टोरीज अपलोड करण्याचीही अनेकांना आवड असते. पण याच इन्स्टा स्टोरीमुळे एका 17 वर्षांच्या मुलाला त्याचा जीव गमवावा लागला.

सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो, लहान-मोठे कोणीही असो, मोबाईल तर वापरतातच. त्यातच सोशल मीडियाचा वापरही खूप वाढलाय, फेसबूक, इन्स्टाग्रामवर स्टोरीज अपलोड करण्याचीही अनेकांना आवड असते. पण याच इन्स्टा स्टोरीमुळे एका 17 वर्षांच्या मुलाला त्याचा जीव गमवावा लागल्याची भयानक, खळबळजनक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटजवळच्या पिंपळगाव (माथनकर) येथे हा प्रकार घडल्याचे समोर आले असून हिमांशु चिमणे असं मृत तरूणाचं नाव आहे. याप्रकरणी आरोपी मानव जुमनाके याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत हिमांशु आणि आरोपी मानव याच्यांत काही दिवसांपासून वाद सुरू होता. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवरील एका स्टोरीमुळे त्यांच्यात वितुष्ट आलं आणि वाद सुरू झाला.साधारण दीड महिन्यापूर्वी हिमांशू आणि मानव यांनी इन्स्टावर सेम स्टोरी टाकली होती. मात्र त्यांच्यापैकी एकाच्या पोस्टला जास्त कमेंट्स आणि लाईक्स मिळाल्या, तर दुसऱ्याच्या पोस्टला एवढा प्रतिसाद मिळाला नाही. आणि एवढ्याशा मुद्यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू झाला होता. पाहता पहातो तो वाद चांगलाच पेटला आणि प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचलं. तो वाद तिथेच थांबला नाही.
काही दिवसांनी हिमांशूने पुन्हा ‘बाब तो बाप रहेगा’ अशी स्टोरी पोस्ट केली. यावरून हिमांशु मानवमध्ये पुन्हा वाजलं. दोघांमध्ये वाद सुरू झाला, पण अखेर हे भांडण मिटावं या हेतून हिमांशू स्वतः मानवच्या घरी गेला. पण वाद काही मिटला नाही, उलट दोघांमध्ये तिथे पुन्हा बाचाबाची झाली. यावेळी संतापलेल्या हिमांशूने मानवला चापट मारली. मात्र वाद आणखी पेटला. हिमांशूने त्याच्या जवळच्या धारधार शस्त्र मानवच्या अंगावर सपासप वार केले. त्याने हल्ल्यानंतर स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्याचा भाऊही मदतीसाठी पुढे आला.
नंतर त्या दोघांनी मिळीन हिमांशूच्या अंगावर वार केले. त्याच्या छातीवर , मानेवर शस्त्राने वार करण्यात आले. हिमांशू जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेमुळे हिंगणघाट परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
