अकोल्यातील सुन्न करणारी घटना, ज्या हातांना राखी बांधली त्याच हातांनी लहान बहिणीचा खून

अकोल्यात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने क्षुल्लक कारणावरुन आपल्या लहान बहिणीची हत्या केली आहे.

अकोल्यातील सुन्न करणारी घटना, ज्या हातांना राखी बांधली त्याच हातांनी लहान बहिणीचा खून
अकोल्यातील सुन्न करणारी घटना, ज्या हातांना राखी बांधली त्याच हातांनी लहान बहिणीचा खून

अकोला : अकोल्यात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका तरुणाने क्षुल्लक कारणावरुन आपल्या लहान बहिणीची हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण अकोला शहर हादरलं आहे. एक भाऊ आपल्या लहान बहिणीची निघृणपणे हत्या कशी करु शकतो? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जातोय. या घटनेवर अकोल्यातील विविध भागांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. अशा नराधम भावाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी काही नागरीक आता करु लागले आहेत.

नेमकं काय घडलं?

बहिण-भावाच्या नात्यला काळीमा फासणारी ही घटना आहे. 19 वर्षीय नेहा नंदनलाल यादव असं मृतक तरुणीचं नाव आहे. तर 24 वर्षीय ऋषिकेश उर्फ बॉबी राममोहन यादव असं मारेकरी भावाचं नाव आहे. बॉबी आणि नेहा या दोघांमध्ये आज (17 जुलै) सायंकाळच्या सुमारास मोबाईलच्या हेडफोनवरुन वाद झाला. या दरम्यान, बॉबीनं नेहाच्या गळ्यावर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केले.

रुग्णालयात नेत असताना नेहाचा मृत्यू

मुलीची आरडाओरड पाहता शेजाऱ्यांनी लागलीचं घटनास्थळ गाठले. जखमी नेहाला उपचारार्थ रुग्णालयात रवाना केले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपी बॉबी यादव हा मृतक नेहाचा आतेभाऊ असून सध्या त्याला खदान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तरीही हत्येच मूळ कारण अद्यापही कळू शकले नसून पुढील तपास पोलीस करत आहे.

चंद्रपुरात नराधमाकडूवन सून आणि पत्नीची हत्या

चंद्रपुरातही अशाच एका हत्याकांडाची घटना समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे. कर्करोगाने त्रस्त असलेल्या पत्नीची काळजी घेण्यावरून सुनेशी भांडण झाले. त्या भांडणातून आरोपीने आधी सुनेची हत्या केली. नंतर आपण तुरुंगात गेल्यावर पत्नीची काळजी कोण घेणार, या चिंतेतून तिलाही संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्याकांडानंतर आरोपी स्वतःहून बल्लारपूर पोलीस ठाण्यात शरण आला.

हेही वाचा : 

मोठी बातमी ! 4 कोटी नव्हे तर तब्बल 350 कोटींची मालमत्ता जप्त, ईडीचा अनिल देशमुखांना मोठा दणका

जुन्या भांडणाचा राग, तरुणावर भर दुपारी गोळीबार, बीड हादरलं! थरार सीसीटीव्हीत कैद

Published On - 8:51 pm, Sat, 17 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI