प्रेम प्रकरण उघड होण्याची भीती, मित्राकडूनच मित्राची गळा आवळून हत्या

प्रेम प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार पालघरच्या बोईसरमध्ये उघडकीस आला आहे.

प्रेम प्रकरण उघड होण्याची भीती, मित्राकडूनच मित्राची गळा आवळून हत्या

पालघर : प्रेम प्रकरण उघडकीस येऊ नये म्हणून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार (Palghar Friend Murder Friend)पालघरच्या बोईसरमध्ये उघडकीस आला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. शिवरत्न असं या 20 वर्षीय मृत युवकाचे नाव असून तो 22 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याची तक्रार बोईसर पोलीस ठाण्यात दाखल होती. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन तपास केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं (Palghar Friend Murder Friend).

आरोपीचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. शिवरत्न आपलं प्रेम प्रकरण उघड करेल, अशी भीती असल्याने आरोपीने त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

बोईसर परिसरातील अवधनगर रोशन गॅरेज गल्ली येथे राहणारा शिवरत्न रॉय हा शनिवारी 22 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता घरात जेवण झाल्यानंतर मोबाईलमध्ये गेम खेळत बसला होता. त्याला त्यांचा मित्र अबुझर लयीयास सिद्धीकी याने व्हॉट्सअ‍ॅप कॉल करुन बाहेर बोलवलं. तेव्हापासून तो घरी परतला नव्हता. याप्रकरणी बोईसर एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी उशिरा शिवरत्न हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आले होती.

घरात काहीही न सांगता बेपत्ता झालेल्या शिवरत्नचा मृतदेह चार दिवसांनी तारापूर औद्योगिक वसाहतीमधील गंगोत्री हॉटेल समोरच्या मोकळ्या मैदाना लागतच्या झाडीत आढळून आला. त्यामुळे बोईसर परिसरात एकच खळबळ उडाली (Palghar Friend Murder Friend).

शिवरत्न रॉय (ऊर्फ शिवम, वय 20) असे मृत युवकाचे नाव असून नुकताच तो दहावी पास झाला होता. शनिवारी (22 ऑगस्ट) रात्री 9 च्या सुमारास अवधनगर मधील रोशन गॅरेजच्या गल्लीतल्या राहत्या घरात जेवण झाल्यानंतर मोबाईलमध्ये गेम खेळत असताना त्याला मित्र अबुझर सिद्धीकीने व्हॉट्सअ‍ॅप कॉल करुन बाहेर बोलावले. त्यामुळे शिवरत्न मोबाईल घरीच ठेवून घरा बाहेर गेला.

त्यानंतर अबुझर सिद्धीकी याने शिवरत्नला गंगोत्री हॉटेलसमोर असलेल्या मैदानात निर्जनस्थळी नेऊन त्याला बेदम मारहाण केली, त्याचा गळा आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर अबुझर सिद्धीकी आणि आरिफ खान यानी शिवरत्नचा मृतदेह बाजूला असलेल्या झुडपात फेकला होता.

मित्राची हत्या केल्यानंतर शिवरत्नला कॉल केलेला अबुझर लयीयास सिद्धीकी याची पोलिसांनी चौकशी केली. मात्र, हा स्वतःहून आपल्या मित्रांचा शोध घेण्याचा बहाणा करुन बेपत्ता मित्राच्या कुटुंबासोबत मित्राचा शोध घेण्याचा बनाव करत होता. मात्र, बोईसर पोलिसांनी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेऊन तपास केल्यानंतर हे नाट्यमय प्रकरण उघडकीस आलं.

Palghar Friend Murder Friend

संबंधित बातम्या :

रडण्याला कंटाळून मातेने नऊ महिन्यांच्या मुलाला संपवलं, चोराने मंगळसूत्र खेचून बाळाची हत्या केल्याचा बनाव

स्वस्तात सोने विक्रीचं आमिष देऊन लुटणं जीवावर बेतलं, अहमदनगरमधील 4 जणांच्या हत्येचा उलगडा

शेजाऱ्यांचं पाहून दोन भावांचा खारी विक्रीचा धंदा, मात्र व्यावसायिक वादातून एकाची निघृण हत्या

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *